मालाड : राष्ट्र सेवा दल, मुंबई आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्यावतीने तरुण-तरुणींसाठी मोफत व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चे आयोजन मालाड च्या रिजॉईस शाळेत दिनांक 10 जुलै रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते संतोष चिकणे यांच्या हस्ते पार पडले.
प्रसंगी पंकज कपूरआणि निसार अली सय्यद यांनी देखील उपस्थित राहून तरुणांचा उत्साह वाढवला तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सचिन नाचनेकर यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले. 21 तरुण तरुणी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष बोरले, लक्ष्मी काउंडर, कृष्णा वाघमारे, शशी गुप्ता , सुरेश सोलंकी, मेरी चेट्टी यांनी अहोरात्र मेहनत घेतली. अशी माहिती वैशाली महाडिक यांनी दिली. तसेच त्यांनी उपस्थितांचे,रिजॉईस शाळा व्यवस्थापन आणि पाहुण्यांचे आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात अशा अनेक कार्य शाळांचे आयोजन गरीब वस्तीतील तरुणांसाठी मोफत करण्याचा निर्धार आहे.