नागपूर : पेप्सिकोच्या भारतीय उपखंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष अहमद एल शेख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतातील व महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात तसेच इतर विविध विषयांवर चर्चा केली.
शेख यांनी पेप्सीको कंपनीच्या सध्याच्या प्रकल्पाची माहिती देऊन देशात तसेच महाराष्ट्रात व्यवसाय वाढविण्याच्या संदर्भात माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात चर्चा केली.