मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे (राणीची बाग) ठेवलेले पेंग्विन्स पाहण्याची उत्सुकता लवकरच संपणार आहे. १७ मार्चपासून ते पर्यटकांना पाहता येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पेंग्विन्स ठेवलेल्या कक्षाचे उद्घाटन करतील. ३१ मार्च पर्यंत पर्यटकांना पेंग्विनदर्शन मोफत होणार आहे. त्यानंतर मात्र ते पाहण्यासाठी शुल्क आकारले जाईल, अशी माहिती पालिकेतील सुत्रांनी दिली.
स्थायी समिती सदस्यांनी पेंग्विन्स कक्षाची पाहणी केली होती. यानंतर ६ मार्चला सातही पेंग्विन्सना त्यांच्यासाठी असणार्या विशेष कक्षात नेण्यात आले. त्यांना ओळखता यावे, यासाठी वेगवेगळ्या रंगांचे लेबल त्यांना चिटकवण्यात आले आहेत.
पेंग्विन्स पाहण्यासाठी प्रौढ- १०० रुपये व मुलांसाठी ५० रुपये आकारले जातील. प्रत्येक दिवशी येणार्या सुमारे ६ ते ७ हजार पर्यटकांसाठी १०० -१०० ची बॅच तयार केली जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पेंग्विन्सचे दर्शन
१ एप्रिलपासून नवे शुल्क लागू होणार
प्रौढांसाठी १०० व लहान मुलांसाठी ५० रुपये
दरदिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी वेळ
आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी बंद