मुंबई : भारतातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या आकड्यांचा विचार करता, व्हेंचर कॅटॅलिस्टची पोर्टफोलिओ कंपनी पिअर टेक्नोलॉजीजने रेस्टॉरंट्सना कॉन्टॅक्टलेस डाइन इन ऑर्डरिंग फिचरची सुविधा मोफत प्रदान करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील या डीप टेक स्टार्टअपने नवीन रेस्टॉरंटसाठी लिस्टिंग चार्जही माफ केले आहे. पिअरच्या पुढाकारामुळे ग्राहकांना कोणताही शारीरिक संपर्क न करता, त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर देता येईल.
या फीचर्सद्वारे ग्राहक कंपनीची भागीदारी असलेल्या कोणत्याही रेस्टॉरंटना घरबसल्या भेट देऊन, क्यूआर कोड स्कॅन करून, थ्रीडी अॅगमेंटेड रिअॅलिटीमध्ये मेनू पाहू शकतात. मेनूकार्ड्स, बिलबुक्ससारख्या स्पर्श करण्यासारख्या गोष्टी टाळता येऊ शकतात. सेवक कर्मचा-यांशी संपर्कही याद्वारे कमी करता येईल. पिअरच्या सुविधेद्वारे ग्राहकांना ऑर्डर देण्यापूर्वी डिशची थ्रीडी इमेज पाहता येईल. झोमॅटो गोल्ड किंवा डाइन आउट गॉरमेंट पासपोर्टसारख्यांची मेंबरशिप न घेता पिअर्सच्या अॅपद्वारे केलेल्या ऑर्डरवर ग्राहकांना ५० टक्क्यांपर्यंत सवलतही मिळते. अशा प्रकारे कॉन्टॅक्टलेस मेनू, कॉन्टॅक्टलेस ऑर्डरिंग आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट या सुवर्ण त्रिकोणाद्वारे बाहेरचे अन्न सेवन करणे अत्यंत सुरक्षित होते.
व्हेंचर कॅटॅलिस्टचे संस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, ‘रेस्टॉरंटमध्ये लोक ज्याप्रमाणे ऑर्डर देत होते, त्या पद्धतीत या साथीच्या आजारानंतर आता खूप बदल होईल, याची आम्हाला खात्री आहे. या बदलाशी जुळवून घेण्याकरिता पिअर रेस्टॉरंट्सना मदत करेल. लॉकडाउन संपल्यानंतर बाहेर जाऊन जेवणे ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्याची क्षमताही पिअरसच्या टीममध्ये आहे.’