‘सिट्रोनचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी जास्त चांगली आंतरराष्ट्रीय व्याप्ती आवश्यक असून त्यासाठी आम्ही ज्या बाजारपेठांमध्ये कार्यरत आहोत, तिथले अस्तित्व जास्त बळकट करणे गरजेचे आहे. त्या बाजारपेठांमध्ये दक्षिण अमेरिका, मध्य पूर्व, आशिया आणि चीन यांचा समावेश असून लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ बनण्याच्या वाटेवर असलेल्या भारतासह इतर बाजारपेठांमध्ये प्रवेश करून ते साध्य केले जाणार आहे. हे साध्य करण्यासाठी आम्ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्याअंतर्गत तीन वर्षांत तीन आंतरराष्ट्रीय स्वरुपाची मॉडेल्स लाँच केली जाणार आहेत. मॉडेल्स धोरणात्मक परिसरात डिझाइन केलेली, विकसित केलेली व उत्पादित केलेली आहेत आणि ती स्टाइल व प्रवास करताना मिळणाऱ्या मनःशांतीच्या बाबतीत सिट्रोनचे पूर्णपणे प्रतिनिधीत्व करणारी आहे. नवी सी3 या आंतरराष्ट्रीय विस्तार योजनेचा आणि विकास धोरणाच्या पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग आहे. ही हॅचबॅक 4एमपेक्षा कमी लांबीची असून भारतातील प्रमुख क्षेत्र व दक्षिण अमेरिकेसाठी बनवण्यात आली आहे. आधुनिक, कनेक्टेड, स्थानिक वापरानुसार तयार करण्यात आलेली ही गाडी सिट्रोनच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वात योग्य आहे.’
व्हिन्सेंट कोबी – सिट्रोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी
नवी सी3 : धोरणात्मक प्रदेशांसाठी “खास तयार करण्यात आलेली”
भारतातील बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सिट्रोनने आपले नेहमीचे डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचा अवलंब करण्याचे ठरवले असून स्टाइल व विकासाचा मेळ घालण्याचा टप्पा प्रत्येक प्रदेशातील टीमकडे सोपवला आहे. त्यामागे अनोखे व मागणीनुसार वाहन तयार करण्याचा उद्देश आहे. भारतीय समाज, संस्कृती आणि गरजांविषयीची जाण त्यात समाविष्ट करण्यासाठी नव्या सी3चे डिझाइन, विकास व उत्पादन भारतात करण्यात आले आहे.
भारतीय बाजारपेठेच्या गरजांना पूर्णपणे प्रतिसाद देणारा प्रोग्रॅम
नवी सी3 सिट्रोनच्या नव्या अध्यायाची सुरुवात असून त्यासाठी तयार करण्यात आलेली मॉडेल्स ब्रँडच्या तत्वाशी सुसंगत तसेच भारतातील विशिष्ट बाजारपेठांच्या गरजांना व्यवहार्य प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक टीम्सनी काळजीपूर्वक संशोधन करून विकसित केलेली आहेत. नवी सी3 2019 मध्ये लाँच करण्यात आलेल्या ‘सी क्युब्ड’ प्रोग्रॅमअंतर्गत तयार करण्यात आलेले पहिले मॉडेल असून या प्रोग्रॅममधील तीन वाहने आंतरराष्ट्रीय आकांक्षेसह 2024 पर्यंत लाँच करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तीन महत्त्वाचे निकष ठेवण्यात आले आहेत- स्पर्धात्मक, बाजारपेठेत आघाडी, दमदार स्टाइल. सिट्रोनच्या अनुभवात आरामाचा मोठा वाटा असून त्या त्या देशातील विशिष्ट गरजांनुसार डिझाइन तयार करण्यात आल्याचा इथे फायदा होतो.
भविष्यातील या सिट्रोन्सचे संबंधित प्रदेशात उत्पादन केले जाईल व त्यामध्ये स्थानिक वैशिष्ट्यांचा मोठा वाटा असेल. त्यातून या देशांशी असलेली आमची बांधिलकी प्रतिबिंबित होईल. त्याचबरोबर यातून खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे धोरण आखले असून त्यामुळे ही मॉडेल्स ब्रँडच्या मुख्य प्रवाहातील स्थानाशी – आधुनिक, दर्जेदार वाहने, आकर्शक स्टायलिंग, दर्जेदार उपकरण, काळजीपूर्वक संशोधनाअंती एकंदर खरेदी आणि किंमत यांच्याशी एकनिष्ठ राहातील.
‘सी3 हे आमच्या सर्व बी- सेगमेंटमधील हॅचबॅकसाठीचे ट्रेड नेम असले, तरी त्याचा अर्थ सर्वत्र एकच मॉडेल असते असा नाही. नवी सी3 युरोपियन आवृत्तीपेक्षा वेगळी असून त्याचे डिझाइन त्या त्या देशानुसार प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. सिट्रोनची ओळख पूर्णपणे दर्शवणारे अनोखे उत्पादन उपलब्ध करून देण्याचा हेतू त्यामागे आहे. कार खरेदी करणं ही ग्राहकासाठी मोठी गुंतवणूक आहे आणि मुख्य प्रवाहातील ब्रँड या नात्याने आधुनिक, प्रतिष्ठित, किंमतीला पूर्ण न्याय देणारे मॉडेल त्यांना मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास, आम्ही ग्राहकाच्या गरजेनुसार हवं ते पुरवण्याचा समतोल साधण्याचे आव्हान आम्ही घेत असतो आणि त्याचवेळेस किंमत स्पर्धात्मक राहील याची काळजीही घेतो. हे साध्य करण्यासाठी स्थानिक टीम्स मॉडेलची व्याख्या, विकास आणि उत्पादनात पूर्णपणे सहभागी करण्यात आल्या होत्या.’
व्हिन्सेंट कॉबी – सिट्रोन मुख्य कार्यकारी अधिकारी
‘सी3 भारतातील आमच्या विकास गाथेचा अतिशय महत्त्वाचा भाग असून आमच्या स्थानिक विकास धोरणाचा कणा असेल. ही कार भारतीय बाजारपेठेच्या थेट हृदयात वसणारी असून तिथूनच सब- 4 मीटर कार्सची 70 टक्के मागणी येते आणि 50 टक्के ग्राहक पहिल्यांदाच खरेदी करणारे असतात. हा वर्ग वेगाने वाढत असून सी3 तिची वाजवी किंमत आणि आकर्षकतेमुळे त्यात चपखल बसेल. भारत व पॅरिसमधील आमच्या टीम्सनी ही कार 90 टक्के स्थानिकीकरणासह बनवली आहे. आमच्या येथील यंत्रणेत दमदार पुरवठादार वर्गाचाही समावेश असून त्यामुळे उच्च दर्जासह योग्य उत्पादनाला स्थान दिले जाते. स्थानिकीकरणाच्या प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी आम्ही चेन्नई येथील संशोधन व विकास केंद्र, थिरूवल्लुर येथील वाहन जुळणी कारखाना, तामिळ नाडू राज्यातील होसूर येथे असलेला पॉवरट्रेन कारखाना यांच्यात समतोल साधणार आहोत. त्याशिवाय आम्ही जागतिक दर्जाचे खरेदी केंद्रही उभारले असून त्याद्वारे सुट्या भागांचा अविरत पुरवठा आणि वाजवीपणाची खात्री केली जाईल. मुख्य प्रवाहात प्रवेश करत असतानाच ग्राहकांना अनोखा अनुभव देण्यासाठी सिट्रोनच्या प्रत्यक्ष तसेच डिजिटल दालनांचे नेटवर्कही जास्तीत जास्त शहरांत विकसित केले जाणार आहे.”
रोलंड बुशाहा – मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतातील स्टेलान्टिसचे व्यवस्थापकीय संचालक –
“सी3, बी- सेगमेंटसारख्या भारतातील अतिशय स्पर्धात्मक सेगमेंटमध्ये प्रवेश करत असून तिच्यात विस्तारण्याची व आणखी विकास साधण्याची भरपूर क्षमता आहे. या सेगमेंटमध्ये उठून दिसणे आणि वेगळी व महत्त्वाकांक्षी कार तयार करणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. या सेगमेंटमध्ये सब-4 मीटर कार खरेदी करण्यासाठी इच्छुक तरुण खरेदीदारांचा मोठा समावेश असून ही कार त्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग वाटते. आपल्या आयुष्यात समतोल पद्धतीने सर्वोत्तम गोष्टी हव्या असणाऱ्यांना, आयुष्याचा आनंद घेणाऱ्यांना, नव्या स्टाइल्स व फॅशन्सचा पाठपुरावा करणाऱ्यांना सी3 आपलीशी वाटेल. हे ग्राहक फॅशनबेल, नाविन्यपूर्ण असून कारमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांना हवे असते. इथेच आमचे कस्टमायझेशन धोरण महत्त्वाची भूमिका बजावते – स्टायलिश राहाणं आवडणाऱ्यांसाठी फॅशन स्टेटमेंट बनवणं.”
सौरभ वत्स – सिट्रोन ब्रँड प्रमुख, भारत
नवीन बाजारपेठ विकसित करताना : भारत
सिट्रोनसाठी भारत ही नवी बाजारपेठ असून लक्षणीय क्षमतेमुळे ती लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ठरेल. ब्रँडने 2019 मध्ये आपले आगमन जाहीर केले होते आणि 2021 च्या सुरुवातीला 2021 : सीफाइव्ह एयरक्रॉस हे आपले पहिले आयात केलेले मॉडेल लाँच केले होते. बाजारपेठेतील नवी कंपनी या नात्याने सिट्रोन सुरुवातीला मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित करत असून त्यासाठी वाहन क्षेत्रात असामान्य ग्राहक अनुभव – नेटवर्क, विक्री, संकेतस्थळ, नाविन्यपूर्ण सेवा यांच्या माध्यमातून आणि उच्च डिजिटल पातळीद्वारे दिला जात आहे. उच्च पातळीच्या स्थानिकीकरणामुळे (90 टक्क्यांपेक्षा जास्त) आणि स्टेलान्टिस समूह आणि सीके बिर्ला समूह (कार जुळणी आणि वितरण व पॉवर- ट्रेन उत्पादन) यांच्यातील दोन संयुक्त भागिदारी करारांमुळे सिट्रोन उत्पादने भारतीय बाजारपेठेच्या आघाडीवर असतील.
भारतातील वाहन उत्पादन क्षेत्र वेगाने विकसित होत असून 2025 पर्यंत वार्षिक पातळीवर चार दशलक्ष कार्सची विक्री होईल असा अंदाज आहे. बी- सेगमेंट हॅचबॅक्सचा या बाजारपेठेतील हिस्सा 23 टक्के आहे. घरानंतर कार खरेदी करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. ते सामाजिक यशाचे, अधिक स्वातंत्र्याचे आणि वाहतुकीचे प्रतीक आहे.
ठळक डिझाइन असलेली नवी सी3 कार आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहे असे वाटणाऱ्या ग्राहकांना आपलीशी वाटेल. अशी कार, जी त्यांना आपल्या आवडीनुसार बदलता येणार असून हे वैशिष्ट्य भारतीय बाजारपेठेही मोठी गोष्ट आहे. त्याशिवाय, सब 4एमचा आटोपशीरपणा, आकार, वैविध्य, मोठी जागा, आरामदायीपणा, कनेक्टिव्हिटी भारतीय रस्त्यावरचा अनुभव निश्चित उंचावेल, तर कस्टमायझेशनचे पर्याय ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीप्रमाणे स्व- अभिव्यक्तीला वाव देणे शक्य करतील. नवी सी3 उच्च दर्जाचे रूप असलेल्या वाहनाचे मूल्य, वैशिष्ट्यपूर्ण स्टायलिंग, स्पर्धात्मक किंमत या सर्व गोष्टी दमदार व व्यवहार्यपणासह तसेच 90 टक्के स्थानिकीकरण कायम राखत देईल. ही गाडी आकर्षक, वेगळी, आधुनिक, कुटुंबाच्या स्मार्टफोनला कनेक्ट राहाण्यासाठी नाविन्यपूर्ण पर्याय देणारी, आपली आवड तसेच व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारी आहे.















