
~ पेमेंट अलर्ट देणारे साधन आता एआय संचालित व्यावसायिक सहाय्यक बनेल ~
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२५: पेटीएमने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये भारतातील पहिला एआय साउंडबॉक्स सादर केला. हे डिव्हाइस व्यापाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने दैनंदिन व्यवहार अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यास सक्षम करते. या साउंडबॉक्समध्ये ११ भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्याची क्षमता असून तो पेमेंट अपडेट्स, व्यवसाय स्थिती आणि आर्थिक माहिती तत्काळ देतो.
हे डिव्हाइस अँड्रॉइड आधारित प्रणालीवर तयार करण्यात आले असून यात पुढे टचस्क्रीन आणि वर माहिती दाखवणारा स्क्रीन असे दोन डिस्प्ले आहेत. याद्वारे व्यापाऱ्यांना रिअल-टाइम अपडेट्स मिळतात आणि त्यांचा व्यवसाय अधिक सुलभतेने चालतो.
साउंडबॉक्समध्ये डायनॅमिक क्यूआर, कार्ड टॅप आणि इन्सर्ट पेमेंट्स करण्याची सुविधा आहे. वायफाय आणि ४जी कनेक्टिव्हिटीमुळे ते दुकान, कॅफे, सुपरमार्केट आणि बाहेरील ठिकाणीही उत्कृष्टरीत्या कार्य करते. पेटीएम बटणद्वारे व्यापाऱ्यांना पेमेंट्स व मदतीचे झटपट अपडेट्स मिळतात. डिव्हाइसमध्ये एआय टोकन सब्स्क्रिप्शन मॉडेल आहे ज्याद्वारे अतिरिक्त एआय वापरासाठी नंतर शुल्क आकारले जाऊ शकते.
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, “क्यूआर कोड पेमेंटपासून साउंडबॉक्सपर्यंत आम्ही विश्वास आणि नवकल्पनांचा नवा अध्याय लिहिला आहे. आता आम्ही एआय उत्पादनांच्या माध्यमातून ‘इंटेलिजन्स युगात’ प्रवेश करत आहोत, जे छोट्या व्यवसायांना अधिक सक्षम करतील. एआय लहान उद्योजकांना जलद वाढ देईल आणि मोठ्या कंपन्यांना अधिक कार्यक्षम बनवेल.”
भारत आता ‘इंटेलिजन्स रिव्होल्युशन’च्या मार्गावर असून, एआय देशभरातील लाखो व्यवसायांना सक्षम करत आहे. स्वदेशी फिनटेक अग्रणी म्हणून पेटीएम भारताला एआय-सक्षम अर्थव्यवस्थेकडे नेत आहे.














