~ वापरकर्त्यांना तत्काळ उपलब्ध होणार त्यांचा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड ~
मुंबई, २८ डिसेंबर २०२१: भारताची आघाडीची ग्राहक व व्यापाऱ्यांसाठीची डिजिटल परिसंस्था ब्रॅण्ड पेटीएमची मालक वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने अॅपमध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या हेल्थ आयडीच्या समावेशाची घोषणा केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून युजर्स अॅपमध्ये त्यांचे अद्वितीय हेल्थ आयडी तयार करू शकतात. हेल्थ आयडीचे लाँच सर्व भारतीयांसाठी उपयुक्त सेवांची श्रेणी एकाच छताखाली आणण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांशी संलग्न आहे. पेटीएम अँड्रॉईड व आयओएस युजर्सना हेल्थ आयडींची निर्मिती करण्यामध्ये सक्षम करणारे सर्वात मोठे ग्राहक व्यासपीठ ठरले आहे.
भारत सरकारचे हेल्थ आयडी भारतीयांसाठी डिजिटल हेल्थ रेकॉर्ड तयार करण्यामध्ये आवश्यक आहे, जे भारतीयांना त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती मंजूरीसह सहभागी आरोग्यसेवा प्रदाते व देयकांना उपलब्ध करून देण्याची सुविधा देते. हेल्थ आयडीच्या माध्यमातून युजर्स दीर्घकालीन हेल्थ हिस्ट्री निर्माण करण्यासाठी हेल्थ आयडीसह त्यांचे पर्सनल हेल्थ रेकॉर्डस् (पीएचआर) लिंक व प्राप्त करू शकतात.
कंपनीचा सहा महिन्यांमध्ये १० दशलक्षहून अधिक भारतीयांना त्यांचे हेल्थ आयडी तयार करण्यामध्ये सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
पेटीएमवर आयडी तयार करणारे युजर्स त्यांचे लॅब रिपोर्टस् प्राप्त करू शकतील, सहभागी हॉस्पिटल्ससोबत टेलि-कन्सल्ट्स बुक करू शकतील आणि पेटीएम ऑपवरील हेल्थ लॉकरमध्ये सुलभपणे सर्व माहितीचे व्यवस्थापन करू शकतील.
पेटीएम मिनी अॅप स्टोअरने हेल्थ स्टोअरफ्रण्ट देखील लाँच केले आहे, आरोग्यसेवा क्षेत्रातील सर्वोत्तम नावांना एकत्र आणते आणि ज्याद्वारे युजर्स टेलिकन्सल्टेशन्स बुक करू शकतात, फार्मसीजमधून खरेदी करू शकतात, लॅब टेस्ट बुक करू शकतात, आरोग्य विमा खरेदी करू शकतात, वैद्यकीय कर्जांसाठी अर्ज करू शकतात. याद्वारे युजर्स त्यांच्या सर्व आरोग्यसेवा गरजांसाठी पेटीएम अॅपवर अवलंबून राहू शकतात.
पेटीएम प्रवक्ता म्हणाले, ”लाखो युजर्स त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पेटीएमचा वापर करतात. सर्व भारतीयांसाठी आरोग्यसेवा ही महत्त्वपूर्ण गरज आहे आणि आमच्या नवीन उपक्रमाच्या माध्यमातून युजर्स पेटीएम अॅपवर त्यांचे युनिक हेल्थ आयडी तयार करू शकतात. ही सुविधा भारत सरकारच्या उपक्रमाशी संलग्न आहे आणि युजर्सना सुलभपणे त्यांचे डिजिटल हेल्थ रेकॉर्डस् उपलब्ध करून देते.”
यापूर्वी पेटीएमने त्यांच्या मिनी अॅप स्टोअरमध्ये डिजिलॉकरची भर केली होती. युजर्स वैयक्तिक लॉकर्समध्ये नोंदणीकृत संस्थांच्या कागदपत्रांच्या सत्यापित इलेक्ट्रॉनिक प्रत शोधण्यासाठी, भर करण्यासाठी, सेव्ह/स्टोअर करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी पेटीएम अॅपमधील डिजिलॉकरचा उपयोग करू शकतात. ज्यामुळे प्रत्यक्ष कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज दूर होते. पेटीएमच्या माध्यमातून कोविड-१९ व्हॅक्सिन्स बुक केलेले युजर्स डिजिलॉकरवर एक क्लिक करत त्यांचे व्हॅक्सिन सर्टिफिकेट्स मिळवू शकतात.