~ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जीएमव्ही २.३४ लाख कोटींच्या घरात ~
मुंबई, १४ मार्च २०२३: भारताच्या अग्रगण्य डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये संपणाऱ्या दोन महिन्यांच्या आपल्या व्यापार कार्यान्वयन कारवाईचे तपशील जाहीर केले आहेत. पेटीएम सुपर अॅपवर सक्रिय राहणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असून फेब्रुवारी २०२३ मध्ये संपलेल्या दोन महिन्यांत या मंचावरून व्यवहार करणाऱ्या यूजर्सची मासिक सरासरी संख्या अर्थात मंथली ट्रान्सॅक्टिंग यूजर्सच्या संख्येत इअर-ऑन-इअर २८ टक्के वाढ नोंदवली गेली आहे व या काळात ही संख्या ८९ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे.
फिनटेक क्षेत्रातील या विशाल कंपनीचे सदस्यत्व सेवेद्वारे अतिरिक्त पेमेंट मॉनिटायझेशन निर्माण करण्यावर केंद्रीत असलेले लक्ष सातत्याने विस्तारत आहे. सध्या ६.४ दशलक्ष व्यापारी पेमेंट उपकरणांसाठी सदस्यत्व शुल्क भरत आहेत. फेब्रुवारी २०२३ च्या महिन्यामध्ये या संख्येत झालेल्या ०.३ दशलक्षांच्या वाढीमुळे ऑफलाइन पेमेंट्सच्या क्षेत्रातील पेटीएमचे अग्रस्थान अधिकच बळकट झाले आहे. “आम्ही सदस्यत्व हे सेवेचे प्रारूप म्हणून वापरत असल्याने उपकरणांचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केला जात आहे, ज्यातून सदस्यत्व नोंदणीतून मिळणाऱ्या महसुलास चालना मिळत आहे व पेमेंट्सची संख्याही वाढली आहे त्याचबरोबर आमच्या व्यापारी कर्ज वितरणाचा आवाकाही वाढला आहे.”
कंपनीच्या मर्चंट पेमेंट्सच्या आकारमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये संपलेल्या दोन महिन्यांमध्ये या मंचाच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात आलेली एकूण मर्चंट ग्रॉस मर्चंटाइझ व्हॅल्यू २.३४ लाख कोटींच्या ($२८.३ बिलियन)च्या घरात पोहोचली असून कंपनीच्या इअर-ऑन-इअर वाढीमध्ये ४१ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. अग्रगण्य कर्जपुरवठादारांच्या भागीदारीने कंपनीकडून केल्या जाणाऱ्या कर्जवितरणामध्ये मोठ्या गतीने वाढ होत आहे व फेब्रुवारी २०२३ मध्ये संपलेल्या दोन महिन्यामध्ये या मंचाच्या माध्यमातून झालेल्या कर्जवितरणामध्ये इअर-ऑन-इअर २८६ टक्के वाढ होऊन ही रक्कम ८,०८६ कोटी रुपयांच्या घरात ($९७९ दशलक्ष) पोहोचली आहे. दोन महिन्यात वितरित करण्यात आलेल्या कर्जांची संख्या ९४ टक्क्यांनी वाढून ७.९ दशलक्ष कर्जांपर्यंत पोहोचली आहे.