~ ९ दशलक्षहून अधिक कर्जांचे वितरण, एकूण तयार डिवाईसेसची संख्या ४.८ दशलक्षापेक्षा अधिक ~
मुंबई, १२ ऑक्टोबर २०२२: पेटीएम या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने नुकतेच आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी त्यांच्या मासिक व्यवसाय कार्यसंचालन कामगिरी अपडेट शेअर केले आहेत. कंपनीचा कर्ज व्यवहार व्यवसायाचा वार्षिक रन रेट ३४,००० कोटी रूपयांपर्यंत (४.१ बिलियन डॉलर्स) पोहोचला आहे, तर तिमाहीसाठी जीएमव्ही वार्षिक ६३ टक्क्यांच्या वाढीसह ३.१८ लाख कोटी रूपये (३९ बिलियन डॉलर्स) राहिला.
पेटीएमने सप्टेंबर २०२२ मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीदरम्यान ९.२ दलशक्ष कर्जे वितरित केली आहेत, ज्यामध्ये वार्षिक २२४ टक्क्यांची वाढ झाली. तसेच एकूण कर्ज मूल्य ७,३१३ कोटी रूपये (८९४ दशलक्ष डॉलर्स) होते, ज्यामध्ये वार्षिक ४८२ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीने ऑफलाइन पेमेंट्समधील आपले अग्रस्थान अधिक प्रबळ केले आहे, जेथे एकूण तैनात डिवाईसेसनी ४.८ दशलक्षचा टप्पा पार केला आहे. पेटीएम सुपर अॅपवर ग्राहक सहभाग सर्वाधिक आहे, जेथे आर्थिक वर्ष २३च्या दुसऱ्या तिमाहीसाठी सरासरी मासिक व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांची (एमटीयू) संख्या ७९.७ दशलक्ष होती, ज्यामध्ये वार्षिक ३९ टक्क्यांची वाढ झाली.
यासह पेटीएमने आर्थिक वर्षाची उत्तम सुरूवात केल्यानंतर दुसऱ्या तिमाहीदरम्यान त्यांची वाढ अधिक प्रबळ केली आहे. आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल वार्षिक ८९ टक्क्यांच्या वाढीसह १,६८० कोटी रूपये राहिला, तर ईबीआयटीडीए (ईएसओपीपूर्वी) नुकसान २७५ कोटी रूपयांपर्यंत कमी झाले, ज्यामध्ये तिमाही-ते-तिमाही ९३ टक्क्यांची वाढ झाली. तसेच कंपनीचा योगदान नफा वार्षिक १९७ टक्क्यांच्या वाढीसह ७२६ कोटी रूपये राहिला, जेथे योगदान मार्जिनमधील वाढ आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीमधील ३५ टक्क्यांच्या तुलनेत महसूलाच्या ४३ टक्के झाली.