मुंबई, १६ डिसेंबर २०२१: पेटेल या ऑफलाइन बीएनपीएल बाजारपेठेतील सक्रिय व वेगाने वाढणाऱ्या कंपनीने, एक ऑल-इन-वन क्यूआर कोड सर्व पार्टनर मर्चंट स्टोअर्ससाठी आणला आहे. वार्षिक ३०० अब्ज डॉलर्स मूल्याच्या व्यापाराच्या चौकटी मोडण्याचे उद्दिष्ट कंपनीपुढे आहे.
या क्यूआर कोडमुळे व्यापारी त्यांच्या सर्व उत्पादनांवर मोफत ईएमआय ऑफर करू शकणार आहेत. ब्रॅण्डतर्फे अनुदान नसले तरी व्यापारी मोफत ईएमआय सुविधा देऊ शकणार आहेत. सध्या या स्टोअर्सना मोठाल्या कंपन्यांकडून पेमेंटमध्ये विलंबाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, या क्यूआर कोडमुळे त्यांना तत्काळ पेमेंट्स मिळू शकणार आहेत. याशिवाय, या अॅप्लिकेशनमधील ‘स्कॅन अँड पे’ फीचरमुळे, ग्राहकांना, पार्टनर स्टोअरसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराचे रूपांतर मोफत ईएमआयमध्ये करण्याची मुभाही मिळणार आहे.
क्यूआर कोड सर्व यूपीआय अॅप्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि पेटेलची २ लाख रुपयांपर्यंतची तत्काळ क्रेडिट लाइन या सर्वांसोबत काम करत असल्याने पेमेंटचा स्रोत तटस्थ राहतो. या अॅपद्वारे क्रेडिट डिलिव्हरी तत्काळ होते आणि व्यापाऱ्याला अधिकाधिक ग्राहक मिळवण्यात मदत होते. कारण, ग्राहक न टिकण्याचे सर्वांत मोठे कारण पैशाची कमतरता हेच असल्याचे निरीक्षणास आले आहे.
अनन्यसाधारण विक्रेताकेंद्री धोरणाच्या माध्यमातून, सर्व उद्योगक्षेत्रांतील लक्षावधी छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्याचे आणि उत्पन्न व नफा वाढवण्याचे उद्दिष्ट पेटेलपुढे आहे. बाय-नाउ-पे- लेटर उत्पादन हा सर्वोत्तम प्रारंभबिंदू आहे, कारण पतउपलब्धतेमुळे अनेक विभागांतील मागणी वाढली आहे. सुलभ व तत्काळ क्रेडिट सहज उपलब्ध झाल्यामुळे ग्राहक त्यांच्या खरेदीची संख्या व दर्जा वाढवू शकतात, यातून व्यापाऱ्यांनाही क्रॉस-सेल व अप-सेलची संधी मिळते.
पेटेलचे सह-संस्थापक विकास गर्ग या लाँचबद्दल म्हणाले, “भारतातील रिटेल क्षेत्र अद्यापही प्रामुख्याने ऑफलाइन व्यापारावर सुरू आहे आणि एकूण खर्चामध्ये ९५ टक्के वाटा ऑफलाइन व्यापाराचा आहे. सहयोगी व्यापाऱ्यांना सेवा देण्याची व त्यांना वाढीत मदत करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आमचे उद्दिष्ट यात पूर्ण शक्तीनिशी उतरण्याचे व या क्षेत्रातील खऱ्या समस्या दूर करण्याचे आहे. भारताला २०२४ पर्यंत जीडीपी ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर वाढीला शुन्यापासून सुरुवात करणे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षांत भलीमोठी लोकसंख्या मनुष्यबळात रूपांतरित होत असल्यामुळे, वाढीच्या पुढील लाटेला चालना ऑफलाइन विक्रेत्यांद्वारेच मिळणार आहे.”