मुंबई : राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची, दळणवळणांच्या साधनांची पायाभरणी झालीअसून, नवी मुंबई विमानतळाच्या प्राथमिक विकासपुर्व कामाची सुरुवात झाली आहे. डिसेंबर 2019 पर्यंत पहिले टर्मिलन आणि एकरनवे तयार होईल, तसेच ट्रान्सहार्बर लिंकचे कामही येत्या साडे चार वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी आज दिली. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मेट्रोचे काम सुरु झाले असून येत्या पाच वर्षात मुंबईकरांसाठी दुप्पट वाहतुक क्षमता निर्माण होणारआहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह, आर्टिफीशीयल इंटेलीजन्स तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठातून विशेष अभ्यासक्रम तयार करून शिकविण्यात येणार आहे. शहर विकासासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष अभियान हातीघेण्यात आले आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी 1 हजार गावांमधून काम सुरु आहे. यासाठी राज्य शासनाने स्वयंसेवासंस्थेमार्फत तिनशे युवकांना दोन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. त्याचप्रमाणे बहुविध लोकपयोगी कार्य शासनाच्या सहयोगानेकरण्यासाठी विविध खासगी संस्थांच्या समवेत आज 32 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या शिवाय ज्या कार्पोरेट संस्था किंवाव्यक्तींना शासनाच्या सहयोगाने सामाजिक कार्य करावयाचे आहे त्यांच्यासाठी”सहयोग’ हा डिजीटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलाआहे. या अंतर्गत अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया अंतर्गत राज्यात बॅंकींग, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान, आणि इतर महत्वपुर्ण क्षेत्रातगुंतवणूक केली आहे. राज्यातील इज ऑफ डुइंग बिजनेस अंतर्गत या कंपन्याना राज्यात उद्योग उभारणी करण्यात सहकार्य मिळालेआहे असे शिष्टमंडळाने आवर्जून नमुद केले.
या बैठकीला उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, मुंबई विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी एस मदान,माहिती तंत्रज्ञान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी,सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नगरविकास विभागा प्रधान सचिव नितीन करीर आणि इतर वरिष्ठ अधिकरी उपस्थित होते.