
सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री एँड आशिष शेलार यांचे पालिका आयुक्तांना निर्देश
मुंबई, दि. 6 August : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या व युनियनशी चर्चा करुन तोडगा काढा असे निर्देश सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री एँड आशिष शेलार यांचे पालिका आयुक्तांना दिले.
दि बी. ई. एस. टी. वर्कर्स युनियनच्या वतीने, १ ऑगस्ट २०२२ नंतर बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या ४,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व इतर थकित देणी तातडीने देण्याच्या मागणीसाठी आज आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान युनियन तर्फे सरचिटणीस शशांक राव यांनी कामगारांचे निवेदन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेऊन देण्यात आले. त्यांनी ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क करुन युनियनच्या शिष्टमंडळाबरोबर या विषयावर चर्चा करण्यास सांगितले. तसेच एँड आशिष शेलार यांनी कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.















