मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली असताना, रस्त्यावर भिजत अडकलेल्या हजारो नागरिकांना मोहित भारतीय फाउंडेशनच्यावतीने वर्सोवा लोखंडवाला लिंक रोडवरील सीसीडीजवळ मोफत छत्री वाटप करण्यात आले.
वर्सोवा लिंक रोडवरील इन्फिनिटी मॉलजवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी मोहित भारतीय फाउंडेशनच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावरील वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी मदतकार्य केले. रस्त्यावर भिजत असलेल्या लोकांना मोफत हजारो छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्राफिकमध्ये अडकलेल्या लोकांना मदत केली.














