-गायत्री दिवेचा, सीएसआर प्रमुख, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट कंपनीज
मलेशिया आणि इंडोनेशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशामधील उष्णकटिबंधीय वर्षावनांची आच्छादने पाम तेल लागवडीसाठी मोकळी केली आहेत. परंतु त्याच दृष्टिकोनातून भारताच्या NMEO-OP च्या नवीन योजनेचे मूल्यमापन करण्यापासून सावध रहा.
बंगळुरू येथील मेघनाने एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडकडून सुगंधित बॉडी मॉइश्चरायझर आणि लिपग्लॉस खरेदी केले. कॅंडिसने टोरंटोमधील तिच्या स्थानिक स्टोअरमध्ये ब्रेड आणि चॉकलेट्सची खरेदी केली. शाहिदाने दुबईत तिच्या फिटनेस सेंटरमधून प्रोटीन बारने भरलेला बॉक्स खरेदी केला. आपण अंदाज लावू शकता का की सर्व वस्तूंमध्ये एक समान गोष्ट काय आहे? ते पाम तेल आहे.
सरासरी शहरी व्यक्ती दररोज वापरत असलेल्या ५०% हून अधिक उत्पादनांमध्ये पाम तेल असते. वैयक्तिक वापर आणि निगा राखणाऱ्या पदार्थांमध्ये ते उत्पादन पातळीवर असताना घातले जाते. बहुतेक खाद्यपदार्थ जसे की चिप्स, बेकरी उत्पादने, पिझ्झा आणि सॉस पाम तेलात शिजवलेले किंवा तळलेले असू शकतात.
सध्या केवळ ३.७० लाख हेक्टर (हे.) देशांतर्गत क्षेत्र पाम तेलाच्या लागवडीखाली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल मिशन – ऑइल पाम (NMEO-OP) या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत २०२५-२६ पर्यंत ऑइल पाम अंतर्गत १० लाख हेक्टर क्षेत्र समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवताना खाद्यतेलाच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या मार्गाशी हे सुसंगत आहे.
पाम तेलाची सर्वव्यापकता आणि अधिक उत्पादनाची भूक यामुळे मोनोकल्चर पाम लागवडीसाठी जागा निर्माण करत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवनांचा नाश केला गेला आहे. त्यातून त्यांच्या मूळ अधिवासातील नामशेष होत चाललेल्या प्रजाती आणखी कमी होत समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जास्त पाणी वापरणारे म्हणून वादात सापडलेले अशी पाम तेलाची ओळख आहे आणि कार्बन डाय ऑक्साइड पृथक्करण करणारी जंगले आणि प्रदेशातील समृद्ध जैवविविधतेची किंमत मोजून त्याची लागवड केल्याबद्दल टीका केली जात आहे. तथापि, भारताची गोष्ट वेगळी आहे, याचे कारण येथे आहे.
पहिले म्हणजे नॅशनल मिशन ऑन एडीबल ऑइल्स – ऑइल पाम (NMEO-OP) जैवविविधता अग्रस्थानी ठेऊन काळजीपूर्वक तयार केले गेले आहे. ऊस आणि भात-साळ यासारख्या कमी उत्पन्न पीकाला पर्याय म्हणून ऑइल पाम सादर केले जात आहे. वृक्षारोपणाचे संपूर्ण निरीक्षण आणि मूल्यांकन केल्यानंतर सरकार ५०% पर्यंत सबसिडी पाठबळ देईल जंगलतोड किंवा नैसर्गिक अधिवासाची हानी होण्यास तिथे काही वाव नाही.
दुसरी गोष्ट, सरकारी मार्गदर्शक तत्त्वे शाश्वत पाम तेलाची लागवड आणि एकात्मिक शेतीवर लक्ष केंद्रित करतात. ऑइल पाम शेतीमध्ये कोको, लाल आले, बुश मिरपूड, केळी आणि शोभेची पिके यासारखी आंतरपिके घेण्यास शेतकऱ्यांना मदत केली जाईल. त्यामुळे पाम तेल लागवडीच्या सुरुवातीच्या बिगर उत्पादक कालावधीत (४ वर्षे) शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल.
तिसरी गोष्ट म्हणजे शेतकर्यांसाठी उत्पन्नाचा धक्का बसण्याविरूद्ध बफर म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, ऑइल पाम पीक नैसर्गिक कार्बन सिंक असण्याची अत्यावश्यक गरज पूर्ण करते. एक हेक्टर ऑइल पाम पीक दरवर्षी ६४ टन कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेते आणि सुमारे १८ टन ऑक्सिजन तयार करते. १० लाख हेक्टर लागवडीवर, भारत ६४ दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साइड शोषण्यास सक्षम असेल जो आपल्या वार्षिक कार्बन उत्सर्जनाच्या १.५% पेक्षा जास्त असेल.
चौथे, भारतात पाम तेलाची लागवड प्रामुख्याने कंत्राटी शेतीद्वारे केली जाते. त्यातून सामायिक मूल्य दृष्टीकोन अधोरेखित होतो. हा मार्ग शेतकऱ्यांना जोखीममुक्त करण्यास मदत करतो, उत्पन्नाची हमी देतो आणि पीक जमिनीचे विविधीकरण करण्याची सुविधा देतो. कॉर्पोरेट भागीदार शेतकऱ्यांना उत्पादन खरेदी हमीसह सर्व इनपुट पुरवितात. यामुळे संभाव्य कार्बन सिंकचा प्रभाव निर्माण होऊन परिसरातील स्वच्छ हवेची गुणवत्ता वाढते.
NMEO-OP जाणीवपूर्वक, शाश्वत विकासाच्या बहुचर्चित मध्यम मार्गावर चालत आहे. हे असे धोरण आहे ज्यामध्ये तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शाश्वततेची तत्त्वे आणि आत्मनिर्भरता एकत्रित केली आहे. या धोरणाकडे मलेशिया किंवा इंडोनेशिया सारख्या दृष्टीकोनातून नव्हे तर भारतातील अंमलबजावणीच्या संदर्भात बघून मूल्यमापन केले पाहिजे.