पटवर्धन हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद समारंभ उत्साहात झाला. गुरुकृपा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर आणि प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी श्रीराम भावे आणि माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे उपस्थित होते.
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी वेदांग कुलापकर, पूर्वा माईणकर, सूर्याक्ष रेमणे, गायत्री किनरे, चिन्मय वाडकर, श्लोक सुर्वे आणि रिया जोशी यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी माजी उपमुख्याध्यापक वसंत आर्डे यांनी परीक्षेसंदर्भात सूचना दिल्या. शिक्षिका प्राजक्ता शिरधनकर, अजित मुळीक, सौ. सुनिता गाडगीळ आणि कैलास वाडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना व परीक्षा लेखनासंदर्भातील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. सुर्वे, गुरुकुल प्रबंधक मनाली नाईक, माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात सौ. जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन हेमलता गुरव यांनी केले. अमर लवंदे यांनी आभार मानले.