
चिपळूण : संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था खेर्डी-चिपळूणची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून, चेअरमनपदी टेरव कुंभारवाडी येथील कुंभार समाजाचे जेष्ठ नेते श्री. तुकाराम मानाजी साळवी व व्हाईस चेअरमनपदी रामपूर-कुंभारवाडी येथील कुंभार समाजाचे जेष्ठ नेते व पोष्ट खात्यातील निवृत्त अधिकारी श्री. तुकाराम गोपाळ टेरवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी निर्णय अधिकारी म्हणून चिपळूणच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी प्रियंका माने मॅडम यांनी काम पाहिले. त्यांनी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाला मार्गदर्शन केले. तर संस्थेच्या वतीने सौ. माने मॅडम यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

दरम्यान संचालक पदी कुंभार समाजाचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, मार्गदर्शक सुभाष कृष्णा गुडेकर (भिले), प्रकाश ना. साळवी ( खेर्डी), सुनिल ग. टेरवकर (मालघर), विष्णू धों. पडवेकर ( पेढे ), सुनिल जा. निवळकर ( कात्रोळी ), तुकाराम सि. साळवी ( सावर्डे), रविंद्र ल. शिरकर ( वालोपे ), सुमन प्रकाश साळवी (खेर्डी), विमल रमेश साळवी ( खेर्डी ) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी समाज बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
