मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरी करत शिकण्यासाठी उपयुक्त असा अर्धवेळ अभ्यासक्रम आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा (दुसरी फेरी) लवकरच घेण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाचे असेल.त्या परीक्षेनंतर लगेचच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. या प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी संस्थेच्या www.gicededu.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरून देणे आवश्यक आहे. या लिंकवर पार्ट टाईम कोर्सेस या सदराखाली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मीडिया मॅनेजमेंट मराठी (PGDMM -MARATHI) या अभ्यासक्रमासाठी फॉर्म भरावा, अशी सूचना संस्थेमार्फत करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी संपर्क-नम्रता कडू (वर्ग समन्वयक, पीजीडीएमएम)- ७९७७४८९०७६















