मुंबई : ईटीव्ही भारत न्यूजचे वरिष्ठ पत्रकार काशिनाथ म्हादे यांचे वडील महादेव काशिराम म्हादे यांचे रविवारी ता. २३ मे रोजी दुःखद निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. चिपळूण येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तालुक्यात सुप्रसिद्ध असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा – सून, चार मुली व जावई, दोन पुतणे – सुना आणि नातवंडे असा एकत्रित कुटुंब परिवार आहे. तळसरमधील पश्चिम म्हादेवाडी येथे मंगळवारी १ जून रोजी दशक्रिया विधी तर ५ जून २०२१ रोजी त्यांचे उत्तर कार्य होणार आहे.