
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कोरोना काळात माणसाला ऑक्सिजन किती आवश्यक होता हे सर्वांनी चांगले ओळखले आहे. निर्सगाने झाडापासून ऑक्सिजन देण्याची सोय केली आहे पण शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली जंगल संपत्ती संपवून इमारती उभारल्या जात आहेत. झाडे लावणे ही आज काळाची ओळखून सामाजिक संस्थांनी पुढाकर घेत वृक्षारोपण करून झाडांचे सर्वधन करण्यात पुढाकार घेतला आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी होऊन `पर्यावरणाचा ऱ्हास नको, ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडे लावा` असा संमाजिक संदेश वृक्षदिंडीतून देत आहेत. शुक्रवारी डोंबिवली जवळील खोणी गावात शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी व वृक्षारोपण केले.
डोंबिवली भारत स्काउड गाईड स्थानिक संस्थेला यावर्षी ५० वर्ष पूर्ण झाली. सुवर्ण महोत्सवनिमित्त डोंबिवली भारत स्काउड गाईड स्थानिक संस्था डोंबिवली, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग व वैशालीताई जोंधळे एज्युकेशन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खोणी गावात वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी वैशालीताई जोंधळे वूमन्स लाॅ महाविद्यालय व युनिव्हर्सल शाळा ( खोणी ) येथे विद्यार्थांनी वृक्षारोपण केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग विभागाचे अध्यक्ष दिनेश खरोटे, सचिव राजेश पटेल, खजिनदार पोपटलाल भंडारी, प्रोजेक्ट व्यवस्थापक प्रकाश शहा, रोटेरियन अवधेश उपाध्ये, किरण ढवळे, स्काउड गाईड चे अध्यक्ष उगले, देवेंद्र जोंधळे आदिसह शिक्षकवर्ग उपस्थित होते. या वृक्षदिंडीत सुमारे ११ शाळा व एक महाविद्यालय सहभागी झाले होते. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी वैशालीताई जोंधळे वूमन्स लॉ महाविद्यालय व युनिव्हर्सल शाळा ( खोणी ) आवारात वृक्षारोपण केले. दरम्यान आदर्श इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थांनी श्रुती प्रधान म्हणाली, पर्यावरण सुरक्षित ठेवले तर येणाऱ्या काळात आपण सुरक्षित राहू. आज प्रदूषण वाढत आहे, प्रदूषण रोखण्यासाठी फक्त झाडातून मिळणारा ऑक्सिजन हाच यावर उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे. वृक्षदिंडीत स.है.जोंधळे विद्यामंदिर, प्रकाश विद्यालय डोंबिवली, आदर्श इंग्लिश मिडीयम डोंबिवली, ओंकार इंग्लीश मिडीयम डोंबिवली, शिवाई बालक मंदिर डोंबिवली, आर.बी.टी. हिंदी शाळा डोंबिवली यांसह १० शाळा वृक्षदिंडीत सहभागी झाले होते.















