रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल.
शुक्रवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता शासकीय वाहनाने पालखी निवासस्थान, ठाकूर कॉम्पलेक्स , कांदिवली (पुर्व) मुंबई येथून आंबेत, मंडणगड मार्गे दापोलीकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता दापोली कृषि विद्यापीठ विश्रामगृह येथे आगमन होईल. सकाळी 11 वाजता शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती असेल. दुपारी 1 ते 2 वाजता खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांबाबत आढावा बैठक दापोली कृषि विद्यापीठ येथे होईल. दुपारी 2 वाजता शासकीय वाहनाने मौजे जामगे, ता. खेड कडे प्रयाण होईल. दुपारी 3 वाजता मौजे जामगे, ता. खेड येथे आगमन होईल. शनिवार 15 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता मौजे जामगे ता. खेड येथून शासकीय वाहनाने आंबेतमार्गे मुंबईकडे प्रयाण करतील.