खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने पोलीस कुटुंबियांसाठी विशेष लसीकरण मोहीम
मुंबई, ता. 19 : मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या विशेष कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने,हेल्प युवर सेल्फ फाऊंडेशन, साई हॉस्पिटल आणि रिझवी एज्युकेशन ट्रस्टच्या सहाय्याने, वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सुमारे 500 हुन अधिक पोलीस कुटुंबियांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस संदीप आयुक्त कर्णिक, वांद्रे डीसीपी अभिषेक त्रिमुखे, ऍडओकेट सौ. रूबीना अख्तर हसन रिझवी, डॉ.अख्तार हसन रिझवी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांच्या कुटुंबियांसाठी होणाऱ्या विशेष कोरोना लसीकरण मोहिमेबाबत समाधान व्यक्त करून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या उच्चाटनासाठी सर्वांना सरकारी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
“कोविड संकटात अहोरात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांचे लसीकरण कोरोना योद्ध्ये मधून पहिल्या टप्प्यात सरकारच्या वतीने करण्यात आले. मात्र, जनतेच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करून पोलिसांच्या योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त आहे” अशा शब्दांत खासदार राहुल शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.