कांदिवली : कांदिवली पश्चिम येथील पार्वतीबाई प्रतिष्ठान सेवा संस्था आणि बृहन्मुंबई महानगर पालिका आर / दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ कुसुमताई नरवणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मूक व ,कर्ण बधिर तसेच सदाफुली कार्यशाळेतील विशेष विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप शिबीर २० ऑगस्ट २०१८ रोजी संपन्न झाले .या शिबिरात एकूण १४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात डॉ जितेश वोरा ,डॉ प्रफुल आवटे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रदीप आंग्रे ,सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे ,मुख्याध्यापिका हर्षदा जयकर ,मुख्याध्यापिका सूचिता चौबळ ,वर्ग सहायिका जयश्री सोलंकी पार्वतीबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल चासकर ,स्वयंसेवक विष्णू पेटकर ,सुनीता चासकर ,आदिनाथ हेंद्रे आणि मनोज गिरीधर सहभागी झाले होते. डॉ कुसुमताई नरवणे मूक आणि कर्ण बधिर शाळा तसेच १५ वर्षावरील विशेष विध्यार्थ्यांसाठी सदाफुली कार्यशाळा या विशेष मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम करतात. मुलांना त्यांच्या केलेले ,आवडीने तसेच सवडीने शिकवून स्वावलंबी बनविण्याचे कार्य करतात . विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या ,हस्तकला साहित्य विकत घेऊन प्रोत्साहन दिले . संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पेन व हस्तकला साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले