मुंबई : प्रजासत्ताक इंडोनेशियाच्या एसिंह प्रांताच्या संसदीय सदस्यांच्या १० सदस्यीय शिष्टमंडळाने अझारी एस. आयपी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या समिती सभागृहात आज (दिनांक १७ जुलै, २०१९) सकाळी भेट घेतली.
याप्रसंगी सुरुवातीला महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करुन महापालिका करीत असलेल्या विविध नागरी सेवा-सुविधा प्रकल्पांची माहिती विशद केली. तसेच याबाबतचे संगणकीय सादरीकरणही करण्यात आले. या भेटी दरम्यान सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या विषयावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाने पालिका मुख्यालयातील आपतकालीन नियंत्रण कक्षास भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱया मलबार हिल नियंत्रण कक्षास भेट देऊन माहिती जाणून घेतली. सदर शिष्टमंडळाने प्रमोद नवलकर ओपन गॅलरीतून मुंबईची पाहणी केली.
यावेळी इंडोनेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत आदे सुकेंदर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए. एल. जऱहाड, उप आयुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) रमेश पवार, प्रमुख, व्यवसाय विकास शशी बाला व प्रजासत्ताक इंडोनेशिया संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते.














