रत्नागिरी दि.17:- भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 17 व 18 ऑगस्ट 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.















