मुंबई : परळमधील एस एस राव मार्गावर फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याचा फायदा महापालिकेला झाला. ती हटवताना पावणे दोनशे वर्षापूर्वीचा मैल हे अंतर दर्शविणारा ब्रिटीशकालीन दगड सापडला.
परळमध्ये असे दोन दगड आहेत. त्यातील एक दगड चित्रा सिनेमागृहासमोर आहे. असे १७ दगड मुंबई बेटावर ब्रिटीशांनी ठेवले. काळा घो़डा येथील सेंट थॅामस चर्च जवळ एक आहे. परळमधील सापडलेला दगड पाचव्या क्रमांकांचा आहे. रोमन अंकात ते लिहिलेले आहे. ब्रिटीशांनी क्रमांकानुसार हे दगड ठेवले आहेत. कुलाबा ते माहिमपर्यंत अशा प्रकारचे मैलाचे दगड आहे. शेवटचे दगड माहिम कॉजवे व सायन किल्ला येथे आहे.
दगडाची उंची साडेचार फुट आहे. या दगडाचे पालिका जतन केले जाईल, अशी माहिती, पालिका उपायुक्त विश्वास मोटे यांनी दिली.
शुक्रवारी फुटपाथवरील १८ स्टॉल, २० झोपड्यांवर कारवाई सुरू असताना जमिनीत साडेचार फुट उंची मैलाचा दगड सापडला. सन १८३८ चा हा मैलाचा दगड आहे. मुंबईत कुलाब्यापासून माहिमपर्यंत एकूण १७ ब्रिटीशकालीन मैलाचे दगड आहेत. त्यापैकी काही दगड गायब आहेत. म्हणूनच पालिकेने या दगडाचे जतन करण्याचा निर्णय़ घेतला आहे.