मालाड, (निसार अली) : मागील अनेक दिवसांपासून मार्वे रोड खारोडी येथे जलवाहिनीतून पाणीगळती होऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हजारो लीटर पाणी यामुळे वाया जात आहे. झालेल्या दुर्लक्षामुळे काल शनिवारी सायंकाळी जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती झाली. त्यामुळे खारोडी ते गेट क्र १ मालवणी पर्यंत मार्वे रोडवर पाणी साचले. रस्ता जलमय झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
अगोदरच हां रस्ता खड्डेमय आहे. आता पाण्याच्यागळतीमुळे ये-जा कशी करावी हा प्रश्न पडला आहे, असे सुलेमान शेख यांनी सांगितले.