महिला आरोग्य विषयक सुंदर मार्गदर्शन, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत.या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात.अन्नधान्य , कपडे,गृहोपयोगी वस्तू,औषधे,वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे,नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर,सचिव प्रदीप गावंड,खजिनदार सचिन साळूंखे,उपाध्यक्ष रमेश पाटील,सहसचिव वैभव घरत,सौ. स्नेहा नानीवडेकर,सल्लागार हनुमंता चव्हाण,सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व परिसरात आपल्या कार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित पंचरत्न मित्र मंडळ व स्वामिनी,भवानी,शिवानी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मंदिर सभागृह,वाशीगांव,चेंबुर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यनिमित्ताने महिलांचे आजार… यामध्ये रजोनिवृत्ती एक अज्ञान आणि विचार बदला…जीवन बदलेल या विषयावर मार्गदर्शन व विविध मनोरंजन कार्यक्रम चा समावेश होता.या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.एफ च्या वित संचालक श्रीमती नजहत शेख मॅडम तसेच कार्यकारी संचालक अनिलकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून प्रमिला विठ्ठलदास पॉलिटेक्लिनिक, एस.एन.डी.टी महिला युनिव्हर्सिटी सांताक्रुज, मुंबई च्या श्रीमती कविता शिकतोडे, टाटा पॉवर कंपनीचे डॉ. विनीत गायकवाड, आर.सी.एफचे वरिष्ठ प्रबंधक अश्विन कांबळे, मार्गदर्शक पोलीस निरीक्षक आर.सीएफ पोलीस ठाणे च्या श्रीमती गौरी संभाजी बंडगर,डॉ. नंदा कुमार (एम.डी- स्त्री रोगतज्ज्ञ), समाजसेविका सौ. स्नेहा नानीवडेकर याशिवाय विशेष पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी तपासे, गरम किटली मराठी सिनेमा प्रमोशनसाठी समृद्धी पाटील, श्रद्धा महाजन, अभिनेता आदित्य पैठणकर आदी मान्यवर व्यासपीठवर उपस्थित होते.उपस्थित पाहुणे यांनी आयोजक पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमला शुभेच्छा दिल्या. तर मार्गदर्शक यांनी महिलांना सोप्या भाषेत महिला आजारपण याबाबत आवश्यक ती माहिती आणि घ्यायची काळजी यावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. महिला वर्गाने या सर्व कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सूत्रसंचालनाची भुमिका सौ.स्नेहा नानिवडेकर यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश पाटील, सचिन साळुंखे, वैभव घरत, हनुमंत चव्हाण,राजश्री कदम, रूपाली नादिवडेकर,शितल यादव, राजलक्ष्मी नायडू यांच्यासह पंचरत्न मित्र मंडळच्या सर्व पदाधिकारी,सभासद, सदस्यांनी मेहनत घेतली.शेवटी अध्यक्ष अशोक भोईर यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमची सांगता केली.