मुंबई : अनधिकृत बांधकामांविरोधात आक्रमक होत पालिका अधिकार्यांनी मढ आणि वर्सोवा येथे कारवाई केली. ‘पी उत्तर’ विभागात मालवणी, मढ, राठोडी, चिकुवाडी आदी परिसरातील खासगी जागांवरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. ‘पी उत्तर’च्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्या नेतृत्वात कारवाई झाली. ३५ अनधिकृत बांधकामांपैकी २३ बांधकामे तोडण्यात आली. यात चित्रीकरण विषयक सामान ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्या ३ गोदांमाचा समावेश आहे. उर्वरित १२ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचे काम देखील आता अंतीम टप्प्यात आले आहे.
‘के पश्चिम’ विभागात वर्सेावा परिसरातील जिल्हाधिका-यांच्या अखत्यारित असणार्या जमिनीवरील आणि सागरी नियमन क्षेत्रामधील (CRZ) १३८ अतिक्रमणे तोडण्यात आली, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.
वर्सेावा परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगरजवळीत सिद्धार्थ नगरात सागरी नियमन क्षेत्रातील जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विनंती केली आणि महापालिकेद्वारे संयुक्त कारवाई झाली.
मढ आणि वर्सोवा या दोन्ही ठिकाणी परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात आली.