पालघर : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पालघर जिल्ह्यात 13 मतदान केंद्र असून शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पुरूष मतदार 2468 व स्त्रिया मतदार 2605 असून जिल्ह्यात एकंदर 5 हजार 73 इतके मतदार समाविष्ट आहेत.
मतदान केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. मतदान केंद्र क्रमांक 1/13, मतदान केंद्राचे नाव-डहाणू, तहसिल कार्यालय डहाणू मतदान केंद्र क्रमांक 2/13, मतदान केंद्राचे नाव-डहाणू(चिंचणी) के.डी हायस्कूल खोली क्र. 2, मतदान केंद्र क्रमांक 3/13, मतदान केंद्राचे नाव- तहसिल कार्यालय जव्हार, मतदान केंद्र क्रमांक 4/13, मतदान केंद्राचे नाव- तहसिल कार्यालय मोखाडा, मतदान केंद्र क्रमांक 5/13, मतदान केंद्राचे नाव- तहसिल कार्यालय पालघर, मतदान केंद्र क्रमांक 6/13, मतदान केंद्राचे नाव-बोईसर, जि.प. मराठी शाळा बोईसर नवापूर रोड, मतदान केंद्र क्रमांक 7/13, मतदान केंद्राचे नाव-सफाळे, जि.प.प्राथमिक शाळा उंबरपाडा, मतदान केंद्र क्रमांक 8/13, मतदान केंद्राचे नाव- तहसिल कार्यालय तलासरी, मतदान केंद्र क्रमांक 9/13, मतदान केंद्राचे नाव- तहसिल कार्यालय वसई, मतदान केंद्र क्रमांक 10/13, मतदान केंद्राचे नाव-वसई-आगाशी, के.जी. हायस्कूल खोली नं. 2 , मतदान केंद्र क्रमांक 11/13, मतदान केंद्राचे नांव-वसई-विरार, तलाठी चावडी मनवेल पाडा, मतदान केंद्र क्रमांक 12/13, मतदान केंद्राचे नाव- तहसिल कार्यालय विक्रमगड, मतदान केंद्र क्रमांक 13/13, मतदान केंद्राचे नाव- तहसिल कार्यालय वाडा इत्यादी समाविष्ट आहे.