रत्नागिरी : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शनिवार आणि रविवार असा दोन दिवस त्यांचा दौरा असणार आहे.
असा आहे दौरा
शनिवार 2 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे ५.२५ वा कोकण कन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण. पहाटे ५.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ८.०० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाहणी व आढावा (स्थळ : शासकीय स्त्री रुग्णालय, उद्यम नगर, रत्नागिरी). सकाळी ९.०० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पाहणी व आढावा. (स्थळ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी) सकाळी १०.०० वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयासंदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सकाळी १०.३० वाजता शिळ धरण प्रकल्पग्रस्त (फणवसळे) व गावठाण संदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सकाळी ११ वाजता निवळी-जयगड रस्त्यासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी ११.३० वाजता सन २०२३-२४ रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी १२.०० वाजता “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” योजनेची बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी १२.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने संगमेश्वर कडे प्रयाण. दुपारी १.३० वाजता उदयजी सामंत साहेब व सिध्देश ब्रीद युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेस उपस्थिती (स्थळ : तांबेडी कोंड, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) दुपारी २.३० वाजता तांबेडी कोंड, ता. संगमेश्वर येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता खैर-ए-उम्मत फाऊंडेशन, मिरकरवाडा, रत्नागिरी आयोजित ऑल इंडिया मुशायरा अखिल भारतीय कवी संमेलन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : देसाई बँक्वेट्स हॉल, विवेक, माळनाका, रत्नागिरी) सायंकाळी ६.०० वाजता “श्री रत्नागिरीचा राजा” आगमन व मिरवणूक (स्थळ : साळवी स्टॉप ते मारुती मंदिर, रत्नागिरी) सायंकाळी ७.०० वाजता रत्नागिरी पत्रकार समन्वय समिती समवेत चर्चा. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव.
रविवार, ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : पाली निवासस्थान, ता.जि.रत्नागिरी) सकाळी ११.०० वाजता पाली येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : गराटेवाडी, पाली, ता.जि.रत्नागिरी) दुपारी ३.०० वाजता सोईनुसार रत्नागिरी येथून मुंबई कडे प्रयाण.