बीड : महाराष्ट्राचा तुफानी मल्ल पै.अक्षय शिंदे व मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक पै.पंकज हरपुडे यांनी बीड चे 100 गरीब विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव चे 10 विद्यार्थी, जामखेड तालुक्यातील शिउर गावचे 7 विद्यार्थी व पै.अक्षय शिंदे यांच्या शिवनी गावचे 80 विद्यार्थी त्यांनी दत्तक घेतले आहे.
पै.अक्षय शिंदे हा बीड चा सुपूत्र असल्याने तिथल्या विद्यार्थ्यांच्या वेदना तो जवळून ओळखतो. बीड दुष्काळी जिल्हा आहे मात्र इथे ज्ञान,अध्यात्म, कुस्ती,अशी मोठी परंपरा आहे. पै.अक्षय शिंदे यांचे मित्र तथा कुस्तीतील मार्गदर्शक पै.पंकज भाऊ हरपुडे यांनी अक्षय च्या या गरीब मुलांना दत्तक घेण्याच्या निर्णयाला दुजोरा दिला व यावर्षी 100 विद्यार्थी दत्तक घेतले. या मुलांचा शाळेचा पूर्ण खर्च पै.अक्षय व पंकज भाऊ उचलतील. या कार्यक्रमात बोलताना पंकज हारपुडे सांगितले की, पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना सुचली व दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले.