मुंबई : मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी, एबी सेलेस्टिअल जेटीवरील पहिल्या तरंगत्या फ्लोटेलचे उद्घाटन तसेच लीना प्रभू-हेगडे लिखित My Path To Prajna या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, मुख्य सचिव सुमित मल्लिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, सुधीर मिश्रा, अभिनेता दिलीप ताहीर, क्रिकेटर दिलीप वेंगसरकर आदी नामांकित व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
डब्ल्यू इंटरनॅशनल कन्सल्टन्टसच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगाने एबी सेलेस्टिअल हॉटेलची उभारणी करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य आणि शहरात पर्यटनाच्या नवीन संकल्पनेला सरकार नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन देत आले आहे. या फ्लोटेलसारख्या वेगळ्या कल्पनेमुळे पर्यटक मुंबईत येतील आणि आदरातिथ्याचा वेगळा अनुभव त्यांना मिळेल.