रत्नागिरी, 17 June : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे आहे .सध्या कोकण भागात निसर्ग चक्री वादळा मुळे फार मोठे नुकसान झाले असून बऱ्याच घरांचे पत्रे उडून गेले आहेत. वीज नाही शेतीचे आणि इतर ही नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे. असेच नुकसान आंबवडे गावाचे झाल्यामुळे दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी आंबवडे गावाला मदतीचा हात देण्यासाठी सरसावले आहेत. गावाचे पुनर्वसन आणि इतर सर्व अडचणी सोडवून विविध प्रकारच्या सोयी सुविधा गावात निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी आणि त्यांच्या डिक्की संस्थेने केला आहे. यासाठी उद्या 18 जून रोजी आंबवडे गावाला मिलिंद कांबळे त्यांच्या डिक्की पदाधिकाऱ्यांसह दाखल होत आहेत. उद्या गावातील प्रत्येक घरासाठी पत्रे, एलिडी दिवे शिवाय जीवनावश्यक वस्तूचे आणि अन्नधान्य किट देणार आहेत .