मुंबई : भायखळा मार्केट येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पादचारी पूल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालिकेने जनतेसाठी खुला केला आहे. या पुलामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भायखळा पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे पादचारी पूल अतिशय धोकादायक स्थितीत असल्याने दोन वर्षांपूर्वी पाडून टाकण्यात आला होता. सदर पूल बंद झाल्याने व नवीन पुलाच्या बांधकामास विलंब झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यामुळे सुंदर गल्ली, मदनपुरा, दगडीचाल,आग्रीपाडा, सातरस्ता, भायखळा मुस्तफा बाजार येथील नागरिकांना तसेच एन्झास्कुल आणि ग्लोरिया स्कुल या शाळेतील विद्याथ्यांना मोठा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. स्थानिकांची अडचण लक्षात घेत ई वार्ड प्रभाग समिती अध्यक्ष गीता गवळी यांनी पालिका प्रशासनाला पुलाचे काम लवकर मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, दोन वर्षांनंतर या पुलाचे काम पूर्ण झाले असून सदर पूल नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.