रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीतील पाचल ग्रामपंचायतीने उल्लखनीय कामगिरी केल्याने स्मार्ट ग्राम योजनेचे मानांकन मिळाले आहे. यामुळे या ग्रामपंचायतीला ४० लाख रूपयांचे पारितोषीक मिळणार आहे.
ग्रामपंचायतीनी आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामकाजाचा स्मार्ट ग्राम योजनेमध्ये आढावा घेऊन, त्यांना उत्तम कार्याबल गौरविले जाते. या योजनेत सन २०१७-१८ या वर्षासाठी राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या समितीमध्ये जि. प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषि विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणिपुरवठा, मुख्या लेखा व वित्त अधिकारी यांचा समावेश होता. समितीने ग्रामपंचायतीला भेट देऊन केलल्या गुणांकानुसार पाचल ग्रामपंचायतीला स्वच्छतेत १४, व्यवस्थापनात १८, दायीत्व १२, अपारंपरीक उर्जा व पर्यावरणात २० पारदर्शकता व पर्यावरणात ९ असे एकून ७३ गुण मिळाल्याचे जाहीर केले. यापूर्वी ग्रामपंचायतीला निर्मळ ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना, स्वच्छता भारत मिशन अंतर्गत पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. स्मार्ट ग्राम पाचल मधील सर्व शाळा, अंगणवाड्या, आरोग्यविभाग, पाचल हायस्कुल, खापणे महाविद्यालय, पोलिस स्टेशन, विज वितरण कंपनी, सर्व बचत गट, सहकारी सेवा सोसायटी आदीनी यासाठी महत्वाचे योगदान दिले. स्मार्ट ग्रामसाठी सर्वांचे सहाकार्य लाभल्याबल सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, ग्रामविकास अधिकारी, ए. जे. नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम सुतार, सिध्दार्थ जाधव, विनायक सक्रे, शंकर पाथरे, पुर्वा पाथरे, रजिया गडकरी, विजया तेलंग, श्रध्दा जाधव, मनिषा बेर्डे, तेजल सुतार यानी सर्वांचे आभार व्यक्त केले. स्मार्ट ग्रामसाठी ग्रामपंचायतीतील कर्मचारी वृंद रघुनाथ आजिवीलकर, सुहास बेर्डे, हरिश्चंद्र गोसावी, नथुराम गुरव, सोनाली कामेरकर, वंदना जाधव व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पत्रकार या सर्वांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले असे उपसरपंच किशोर नारकर यांनी सांगितले.