नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 31 मार्च 2017 पर्यंत कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची संख्या 11,30,840 इतकी होती. 13 मार्च 2018 रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या 2016-17 वर्षातील एका सर्वेक्षणात ही माहिती नमूद करण्यात आली. यात 11,30,840 पदांवर व्यवस्थापकीय आणि कार्यकारी स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 31 मार्च 2017 पर्यंत 3,38,521 कंत्राटी कामगार नेमण्यात आल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. श्रम आणि रोजगार राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)संतोष कुमार गंगवार यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.