मुंबई, 30 जून, 2022: प्रादुर्भावाचे निदान लवकर व अचूक झाल्यास योग्य उपचार पुरवण्यातील वेळ व खर्च कमी होतो आणि त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला होणाऱ्या त्रासाचा कालावधीही कमी होतो हे आता काळाच्या ओघात प्रस्थापित झाले आहे. पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीने याच उद्दिष्टासह अलीकडेच अगम्य व कठीण केसेसमधील प्रादुर्भावाचे निदान लवकर करणारा ‘एफडीजी लेबल्ड ल्युकोसाइट पेट-सीटी स्कॅन’ सुरू केला आहे. सध्या ही चाचणी करणारे, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी, मुंबईतील व संपूर्ण पश्चिम भारतातील एकमेव रुग्णालय आहे.
प्रादुर्भाव व निर्जंतुक दाह (इन्फ्लेमेशन) यांतील फरक ओळखणे हे क्लिनिशिअन्स पुढील प्रमुख क्लिनिकल आव्हान असते. हाय-रिझोल्युशन इमेजिंग पद्धतीचा वापर करून नियमितपणे केले जाणारे स्कॅन्स हे अनेक अंगांनी उपयुक्त असतात व बहुतेक केसेसमध्ये यांतून स्पष्ट उत्तरे मिळतात, पण काही आव्हानात्मक केसेसमध्ये प्रादुर्भावाचे निदान कठीण असू शकते, यांत क्लिनिकल स्तरावर झालेल्या द्विधेचे उत्तर मिळत नाही. आता ‘एफडीजी लेबल्ड ल्युकोसाइट पेट-सीटी स्कॅन’ इमेजिंग प्रक्रियेत अधिक अचूकता आहे. त्याचप्रमाणे यात संवेदनशीलता व रिझोल्युशनही उच्चस्तरीय आहे, तसेच यातून कार्यात्मक + शरीरशास्त्रविषयक माहिती मिळते आणि आवश्यकता भासल्यास या चाचणीद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे या चाचणीद्वारे निदान अधिक अचूकतेने केले जाऊ शकते, ज्या रुग्णांची तपासणी पारंपरिक इमेजिंग पद्धतींद्वारे करणे शक्य नाही, त्यांच्यावरही ही चाचणी केली जाऊ शकते. यामुळे हा स्कॅन क्लिनिकल तपासणीतील एक शक्तिशाली साधन झाला आहे.
*हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीमधील न्युक्लीअर मेडिसिन विभागाच्या प्रमुख व कन्सल्टण्ट डॉ. नताशा सिंग म्हणाल्या,* “हा वेगळ्या प्रकारचा तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या प्रगत असा हाय-रिझोल्युशन ‘एफडीजी लेबल्ड ल्युकोसाइट पेट-स्कॅन’ म्हणजे संशयित प्रादुर्भावाच्या आव्हानात्मक केसेस हाताळण्यासाठी डॉक्टरांना मदत करणारे महत्त्वाचे साधन आहे आणि उपचारांचे व्यवस्थापन अधिक चांगले करण्यातही याची मदत होते. क्लिनिकल उपयोजनात ही चाचणी अन्य काही प्रगत प्रादुर्भाव इमेजिंग पद्धतींच्या तुलनेत श्रेष्ठ आहे आणि पेरि-प्रोस्थेटिक किंवा ऑर्थोपेडिक प्रत्यारोपणातील प्रादुर्भाव, अगम्य प्रादुर्भाव, डायबेटिक फूट, चारकोट जॉइंट आदींसाठी ही विशेषत्वाने उपयुक्त ठरली आहे. ही प्रक्रिया अगदीच सुरक्षित आहे. अगदी मूत्रपिंडात बिघाड झालेल्या रुग्णांसाठीही ती वापरली जाऊ शकते. अशा रुग्णांमध्ये काँट्रास्ट-एन्हान्स्ड सीटी व एमआरआय चाचण्यांचा वापर न करण्याचा सल्ला सहसा दिला जातो.”
*पीडी हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना म्हणाले,* “ही एक नवीन युगातील पद्धत आहे. या पद्धतीद्वारे गुंतागुंतीच्या व निदानास कठीण समजल्या जाणाऱ्या केसेसमध्ये प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या लक्षणांचे निदान शक्य होते. ‘एफडीजी लेबल्ड ल्युकोलाइट पेट-सीटी स्कॅन’ काही क्लिनिकल उपयोजनांमध्ये अन्य प्रगत प्रादुर्भाव इमेजिंग पद्धतींच्या तुलनेत श्रेष्ठ आहे. आम्ही, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, नवीनतम जागतिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून रुग्णांना दर्जेदार उपचार देण्यासाठी, सातत्याने प्रयत्नशील असतो आणि या स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देणारे मुंबई व पश्चिम भारतातील पहिले रुग्णालय ठरल्यामुळे आम्ही खूपच आनंदित झालो आहोत.”
वेळ हा नेहमीच अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि निदान लवकर झाल्यास योग्य उपचार शोधण्यात व प्रादुर्भावाला विकलांगता आणणाऱ्या/प्राणघातक स्वरूपात रूपांतर होण्यापारून थांबवण्यात मदत होते. अनेक आजार केवळ लवकर निदान झाल्यामुळे बरे होतात आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.