
मुंबई : वाढते कार्बन उत्सर्जन, समुद्राची वाढती पातळी, कमी होत जाणारे वन्यजीव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामानातील बदल यांचा आपल्या पर्यावरणावर आणि निसर्गावर गंभीर परिणाम होत आहे. उत्सर्जन आणि आपले पर्यावरण बिघडवणारे इतर घटक जसजसे वाढत आहेत, तसतसे अधिक चांगल्या व सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे बनले आहे. जागतिक पर्यावरण दिन २०२२ ची थीम ‘ओन्ली वन अर्थ’ आपल्या एकमेव भूमातेला सामना कराव्या लागणा-या परिणामांची आठवण करून देते. या थीमच्या अनुषंगाने पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटरने सँड आर्टिस्टसोबत उत्साहवर्धक सँड आर्ट तयार करत जागतिक पर्यावरण दिन २०२२ साजरा केला. सँड आर्टचा वापर नागरिकांना पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या वाढत्या गरजांची आठवण करून देण्यासाठी एक माध्यम म्हणून केला गेला.
याव्यतिरिक्त हॉस्पिटलमधील कर्मचा-यांच्या मुलांनी हॉस्पिटलसमोरील भिंतीवर स्थिर पर्यावरण व सुरक्षित निसर्गाचे संदेश देणारी चित्रे काढली. हॉस्पिटलने त्यांच्या कर्मचा-यांना पेपरचा वापर कमी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अंतर्गत मोहिम राबवली आणि त्यांच्या नॉन-पेशंट ऑपरेशन्समध्ये नो पेपर प्रिंटींग डे सह हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. १ टन प्रमाणित कार्यालयीन कागद निर्माण करण्यासाठी २४ झाडे कापली जातात, तर १ टन कागदाचा पुनर्वापर केल्याने जवळपास ६८२.५ गॅलन तेल, २६,५०० लिटर पाणी आणि १७ झाडांची बचत होते.
हॉस्पिटलच्या सुरक्षित पर्यावरणाप्रती कटिबद्धतेला सादर करत पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड एमआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौतम खन्ना म्हणाले, ”जबाबदार संस्था म्हणून आम्ही समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबत संतुलन राखण्याचे काम करतो. आम्ही नेहमीच निसर्गाचे संरक्षण करण्याप्रती आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याप्रती सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. यंदा आमचा आपल्या देशाचे भविष्य असलेल्या मुलांना सामावून घेत आणि आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अधिक कार्य करत राहण्याप्रती स्वत:ला प्रोत्साहित करत कला प्रकारांच्या माध्यमातून जागरूकतेचा प्रसार करण्याचा मनसुबा आहे.”
दरवर्षाला आपल्या पर्यावरणाचा -हास होत आहे. काही दशकांपूर्वी केलेले भाकित आता खरे ठरत आहेत. हीच वेळ आहे की, आपण परिणाम ओळखून आपल्या भूमातेसाठी एकत्र येऊन कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करत आवश्यक परिवर्तन केले पाहिजे, ज्यामुळे भावी पिढ्यांचे जीवन उत्तम असेल.
पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर विषयी:
१९५१ मध्ये एक क्लिनिक म्हणून सुरू झालेले हिंदुजा ग्रुपचा भाग पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटर आज देशातील अग्रगण्य मल्टि-स्पेशालिटी टेरिटरी केअर हॉस्पिटल्सपैकी एक समजले जाते. जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा सर्वांना पुरवल्या जाव्या यासाठी ही संस्था सात दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. या संस्थेचे सध्या दोन युनिट्स आहेत, माहिम येथे ४०० बेड्स असलेले एक युनिट आणि खार येथे १०० बेड्स असलेले दुसरे युनिट. दोन्ही युनिट्समध्ये अत्याधुनिक पायाभूत असण्यासोबत काही सर्वोत्तम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यताकृत डॉक्टर्स आहेत. माहिम येथील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल केअर सेवा देण्यामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. ते सर्वात प्रगत पूर्णत: एकीकृत रोबोटिक्स सिस्टिम, गॅमा नाइफ, डिजिटल ब्रॉडबॅण्ड एमआरआयसह पुरेशा थीम्स, ट्रू बीम लायनर अॅक्सेलेरेटर इत्यादी तंत्रज्ञानांचा अवलंब करणा-या देशातील पहिल्या काही हॉस्पिटल्समध्ये या हॉस्पिटलचा समावेश होतो. दर्जात्मक केअर सुविधेला प्राधान्य देणारे हे हॉस्पिटल एनएबीएच, सीएपी आणि आयएसओचे मानांकन व प्रमाणपत्र लाभलेल्या पहिल्या काही हॉस्पिटल्सपैकी एक आहे. हॉस्पिटल भारतातील संसर्गजनय आजारांसंदर्भात संशोधनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापित करण्यासाठी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सहयोग करत आहे. नुकतेच हॉस्पिटलने द डिव्हिजन ऑफ एड्स (एनआयएआयढी, एनआयएच), यूएसए सोबत सहयोग केला आहे. पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलला उद्योगक्षेत्रातील विविध संस्थांनी अनेक सर्वोत्तम मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल पुरस्कार प्रदान केले आहेत. २०२० व २०२१ मध्ये न्यूजवीक वर्ल्डस् बेस्ट हॉस्पिटल सर्व्हेमध्ये हॉस्पिटलला पश्चिम भारतातील पहिल्या क्रमांकाचे, तर भारतातील खाजगी हॉस्पिटल तिस-या क्रमांकाचे आणि भारतातील सर्व हॉस्पिटल्समध्ये ६व्या क्रमांकाचे हॉस्पिटल म्हणून सन्मान मिळाला. चॅरिटीसंदर्भात हॉस्पिटल गरजूंना मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये उपचार सेवा देते आणि सर्व्ह विथ पॅशन ग्रामीण आरोग्य उपक्रम देखील रावबते, ज्याअंतर्गत महाराष्ट्रातील आदिवासी भागांत मोफत आरोग्यसेवा पुरवली जाते.















