
बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालण्याच्या निर्णय़ावरून उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला कठोर शब्दात फटकारलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे खाद्यपदार्थ विकणं नाही अशा शब्दात उच्च न्यायालायानं मल्टिप्लेक्स असोसिएशनला झापत राज्य सरकारच्या भुमिकेवर सुद्धा न्यायालयाने ताशेरे ओढले होते. या प्रकरणी जे अनेक वेळा आपण सांगत आलोत तेच परत सांगत असल्याचं सांगून मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास कुणी अडवू शकत नाही मात्र ते आत सिनेमागृहात खावू नये असा नियम आणि कायदा सांगतो. तसेच एमआरपी पेक्षा जास्त किमतीने पदार्थ विकले जात असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सष्ट केलं.