मुंबई, 4 जून : अग्रगण्य डायरेक्ट सेलिंग स्वीडिश ब्यूटी ब्रांड ओरिफ्लेमच्या मते, सौंदर्य हे केवळ आपण कसे दिसतो, यावर अवलंबून नसते. ते आपल्या काम करण्याच्या पद्धतीतूनही दिसून येते. काही बदलांमुळे आपल्या आजूबाजूचे जग अधिक सुंदर बनवता येऊ शकते. ब्रँडच्या मते, आपण सर्व व्यक्ती, आणि कंपन्या आपल्या आजूबाजूला सभोवताली असलेल्या विशाल नैसर्गिक संसाधनांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यास समर्थ आहोत. या पार्श्वभूमीवर, ओरिफ्लेम ही एक चिरंतन चालणारी कंपनी बनण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट नियोजित करत आहे. हा ब्रँड सस्टेनेबल बिझनेस प्रॅक्टिसेसचे पालन करणे आणि जल, जलवायू आणि वन यावर त्याचा दुष्परिणाम कमी करण्यास वचनबद्ध आहे.
पाणी हा सर्वात महत्त्वाच्या निर्मितीसाठीच्या घटकांपैकी एक आहे आणि ओरिफ्लेम नैसर्गिक जलस्रोत आणि महासागरांच्या देखभालीसाठी वचनबद्ध आहे. जगभरात पाण्याच्या कमतरतेमुळे ब्रँडने २०१५ च्या तुलनेत आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये उत्पादन प्रक्रियेत पाण्याचा वापर १८ टकक्यांनी कमी केला आहे. जगभरातील जल स्रोतांचे रक्षण करण्याच्या ध्येयांतर्गत ओरिफ्लेम ‘लव्ह नेचर’चे रिंस-ऑफ फार्म्युलेशन सिलिकॉन फ्री, बायोडिग्रेडेबल असून केवळ नैसर्गिक रुपात प्राप्त एक्सफोलिएटिंग पार्टिकल्सचाच ते वापर करतात. वास्तवात २०१६ नंतर ओरिफ्लेमने प्लास्टिक मायक्रोबिड्ससह रिंस ऑफ प्रोडक्ट्स बनवणे बंद केले. फक्त १०० टक्के नॅचरल एक्सफोलिएंटचा वापर केला जातो. हे आपल्यासाठी तसेच महासागरांसाठीही उत्तम आहे.
जलवायू संकटाचा वास्तविक आणि निरंतर वाढणारा धोका लक्षात घेता, ओरिफ्लेमने १०० टक्के क्लायमेट न्यूट्रल ऑपरेशन्स मिळवले आहेत. मागील एका दशकात ब्रँडने धोकादायक कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन कमी केले आहे. २०१० पासून आतापर्यंत यात ४८ टक्के कपात करण्यात आली. सध्या ब्रँडचे निर्मिती प्रकल्प आणि कार्यालयांमध्ये वीज उपकरणांमध्ये सौर, पवन आणि जलविद्युत निर्मितीतून निर्माण होणारी १०० टक्के वीज वापरली जाते. यासह कंपनीची ओळखच तिच्या सुगंधात नैसर्गिक स्वरुपातील अल्कोहलचा वापर करणारी, अशी आहे. यामुळे वातावरण बदलावर नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी नैसर्गिक कच्च्या मालाचा उपयोग करण्याप्रति त्यांची वचनबद्धता अधोरेखित होते.
ओरिफ्लेमचे दक्षिण आशियाचे वरिष्ठ संचालक रीजनल मार्केटिंग नवीन आनंद म्हणाले, “ स्वीडिश सौंदर्य ब्रँडच्या रुपात पर्यावरणाची देखभाल करणे आमच्या डीएनएमध्ये आहे. त्यामुळेच आम्ही व्यापार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक, सुंदर बदल करण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून पृथ्वीवर या व्यापाराचा दुष्परिणाम कमी होईल. आपण ज्या ग्रहावर राहतो, त्यासाठी आमची उत्पादने १०० टक्के सुरक्षित आहेत. आपण नेहमी अभिमान बाळगावा, असे हे वास्तव आहे. त्यामुळेच मला जगाला ‘हॅपी इन्व्हायरमेंट डे’ म्हणतानाही आनंद होत आहे.”