
मुंबई : थेट विक्री करणारा आघाडीचा स्वीडिश ब्यूटी ब्रॅंड ओरिफ्लेम आपल्या अनोख्या उत्पादनाच्या श्रेणींमार्फत शुद्ध, नितांत सुंदर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक सौंदर्य समोर आणते. याच धर्तीवर ओरिफ्लेमने आपली नवीनतम श्रेणी ऑप्टिमल्स क्लिअर व्हाईट सादर केली आहे. ओरिफ्लेमची ऑप्टिमल्स क्लिअर व्हाईट श्रेणी त्वचेला हायड्रेटेड ठेवते, सखोल पोषण प्रदान करते आणि निस्तेज त्वचेला तजेला देते. ती त्वचेला कसून स्वच्छ करते आणि त्यामुळे त्वचा मुलायम, नितळ आणि ताजीतवानी होते.
ही संपूर्ण श्रेणी एक संपूर्ण ब्यूटी रूटीन म्हणून वापरता येऊ शकते. क्लींझिंग आणि टोनिंगच्या पहिल्या टप्प्यात त्वचेवरील मेकअप, अशुद्धी दूर होते व त्वचा पुढील प्रक्रियेसाठी सज्ज होते. त्यानंतर येते आय-क्रीम, जे झटपट तेजस्वीपणा देते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हळूहळू कमी होऊ लागतात. त्यानंतर सीरमने त्वचेला एक जोम येतो आणि शेवटी डे/नाइट क्रीम त्वचेला मॉईश्चराईझेशन आणि हायड्रेशन पुरवते.
निसर्गाने परिपूर्ण केलेल्या व शास्त्राने इष्ट केलेल्या या ऑप्टिमल्स क्लिअर व्हाईट श्रेणीतील प्रत्येक उत्पादन अनोख्या नैसर्गिक घटक मिश्रणांनी समृद्ध आहे. या श्रेणीतील प्राथमिक घटक आहे, लिकरिस, जो त्यातील त्वचेला उजळ करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. सिल्व्हर बर्च, मेडोस्वीट, ब्लूबेरी, रास्प बेरी, स्वीट चेरी सारख्या अनेक नैसर्गिक समावेश असलेली ही श्रेणी उजळ, तेजस्वी आणि अधिक सुंदर त्वचा उघड करते. या श्रेणीत त्वचाविज्ञान शास्त्राने परीक्षण केलेली, उपभोक्त्यांनी पारखलेली व पॅराबेन-मुक्त डे क्रीम, नाइट क्रीम, सीरम, क्लींझिंग फोम आणि टोनर समाविष्ट आहेत














