
घाटकोपर (प्रतिनिधी): शास्त्रीय संगीताच्या सुरांचा वारसा पुढे नेण्यासाठी ‘शशिकला संगीत प्रतिष्ठान’ प्रस्तुत ‘बढत’ या विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका सुयोग कुसूरकर – मराठे यांच्या सुरेल गायनाचा आस्वाद संगीतप्रेमींना घेता येणार आहे.
सुरांची साधना आणि शास्त्रीय संगीताचा नवा प्रवास उलगडणाऱ्या या कार्यक्रमात त्यांना उत्कृष्ट वादकांची साथ लाभणार आहे. तबल्यावर सागर मेस्त्री आणि हार्मोनिअमवर आदर्श कदम यांची साथसंगत लाभेल.
आयोजनाचा तपशील:
-
दिनांक: रविवार, १६ ऑगस्ट २०२६
-
वेळ: सकाळी १० वाजता
-
स्थळ: छेडा नगर जिमखाना, घाटकोपर (पूर्व), मुंबई
संगीतप्रेमींनी या सुश्राव्य शास्त्रीय संगीत मैफिलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.














