Mumbai : पहलगाममध्ये आमच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताने योग्य प्रत्युत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदुर’ अंतर्गत नियंत्रण रेषेजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर झालेली एअर स्ट्राईक ही केवळ एक लष्करी कारवाई नसून, ती संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाचं आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे. अशी प्रतिक्रिया आमदार संदीप जोशी यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला नसून, प्रत्येक हल्ल्याला कठोर उत्तर देण्याची तयारी ठेवतो, हे आज पुन्हा सिद्ध झालं आहे. आमचे सैनिक, त्यांची शौर्यगाथा आणि सरकारची तत्काळ कारवाई यामुळे जनतेत विश्वास निर्माण झाला आहे की देश सुरक्षित हातात आहे.
दहशतवादाला आणि त्याला पोसणाऱ्या शक्तींना भारत आता मुळापासून उखडून टाकणार, हे या कारवाईने स्पष्ट केलं आहे. मी या धाडसी निर्णयाचं मन:पूर्वक स्वागत करतो आणि आपल्या शूर जवानांना अभिवादन करतो.”