नवी दिल्ली, 26 जून : INS जलाश्व या जहाजाचे ईराणच्या बंदर अब्बास नजिक 24 जून 2020 ला संध्याकाळी आगमन झाले. भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्र-सेतू अंतर्गत दुसऱ्या कामगिरीसाठी 25 जून 2020 ला ते बंदरात पोहोचले. या जहाजावर 687 भारतीय नागरिक आहेत. त्यांची वैद्यकिय आणि सामान-तपासणी करण्यात आली आहे.
इराणकडे प्रस्थान करतानाच, INS जलाश्वचा कर्मचारीवर्ग स्थलांतरीतांसाठी लागणाऱ्या सर्व तयारीनिशी सज्ज होता. यामध्ये स्वच्छता साधने आणि मास्क तसेच प्रसाधनसाधनांसह प्रत्येक प्रवाश्यासाठी जागा याही व्यवस्थांचा समावेश होता. ही तयारी तेहरानमधील भारतीय दूतावासाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार करण्यात आली होती.
या जहाजाने कोविड -19 च्या रुग्णांसाठी भारतीय नौदलाने बनवलेले दोन एअर इव्हॅक्युएशन पॉड इराणी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
कोविड-19 साठीची सावधगिरीचा भाग म्हणून जलाश्ववरील (ऑन बोर्ड) जागा तीन भागात विभागली गेली आहे. यात प्रवाशांसाठीची स्वतंत्र जागा तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या जहाजाच्या कर्मचाऱ्यांच्या जागांचा समावेश आहे. जहाजावर प्रवासी घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 25 जून 2020 ला संध्याकाळी उशीरा या जहाजाने बंदर अब्बासमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.