रत्नागिरी, (आरकेजी) : डिजीटल इंडिया उपक्रमा अंतर्गत रत्नागिरी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर ने जोडून ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट देण्याचे काम सुरु आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्हायातील पहिल्या दोन ग्रामपंचायती ऑनलाइन करण्याचा शुभांरभ ग्रामपंचायत करबुडे, ता. रत्नागिरी व ग्रामपंचायत बुरंबाड ता. संगमेश्वर येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सोमवार दि. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ११.०० व दुपारी ०२.०० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्नेहा सावंत उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे महाप्रंबधक, भारत संचार निगम, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.