
शुक्रवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास करी रोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीमधील 19 व्या मजल्याला आग लागली. स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरुण तिवारी नामक एका व्यक्तीने इमारतीच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेतल्याने त्याला आपल्या प्राणांना मुकावे लागले.
मंत्री शेख म्हणाले की, प्रत्येक इमारत प्रशासनाला यापुढे अग्नी सुरक्षा अहवाल दर सहा महिन्यांनी पालिकेला सादर करणं अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच उंच इमारतीमधील सुरक्षा रक्षकांना देखील अग्नी सुरक्षाविषय प्रशिक्षण घेणं अनिवार्य करण्यात येणार आहे.
इमारतींमधील अग्नीसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्यादृष्टीने अग्नीशमन विभाग व संबधित अन्य विभागांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री शेख यांनी शेवटी सांगितले.