~ मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी: औद्योगिक केंद्रस्थान म्हणून ओडिशामधील परिवर्तन केले अधोरेखित ~
मुंबई, २१ ऑक्टोबर २०२४: ओडिशाच्या औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा रोड शो मुंबईत यशस्वीपणे पार पडला. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाला मिळालेल्या भरघोष प्रतिसादानंतर या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रोड शोचा हा दुसरा टप्पा होता. ओडिशाचे माननीय मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाने २८-२९ जानेवारी, २०२५ रोजी भुवनेश्वरमध्ये होणार असलेल्या ‘उत्कर्ष ओडिशा – मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२५’ च्या तयारीमध्ये एक पुढचा टप्पा रचला.
मुंबईच्या कार्यक्रमामध्ये उद्योगक्षेत्रातील दिग्गज व प्रभावी व्यापाऱ्यांनी भाग घेऊन ओडिशामधील वाढत्या आणि विकसित होत असलेल्या गुंतवणूक वातावरणावर केंद्रित धोरणात्मक चर्चांमध्ये भाग घेतला. माननीय मुख्यमंत्री श्री माझी यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये कौशल्यांवर आधारित उद्योगांचे केंद्रस्थान म्हणून ओडिशामध्ये घडून येत असलेले परिवर्तन अधोरेखित केले, यामध्ये आयटी, कपडे, नूतनीकरणीय ऊर्जा, प्लास्टिक, रसायने आणि पेट्रोकेमिकल यासारख्या क्षेत्रांवर भर दिला.
ओडिशाच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिग्गज उद्योगपती यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठका केल्या. प्रमुख क्षेत्रांमध्ये संभाव्य सहयोगाबाबत चर्चा केल्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे गुंतवणूक डेस्टिनेशन म्हणून ओडिशाचे स्थान मजबूत करण्यावर जोर दिला गेला.
मुंबईत रोड शोची प्रमुख वैशिष्ट्ये:
• आयटी, रसायने, पेट्रोकेमिकल्स, उत्पादन, प्लास्टिक आणि नूतनीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधील दिग्गजांसोबत उच्च स्तरीय व्यावसायिक संबंध.
• फूड प्रोसेसिंग पार्क, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स हबचा विस्तार यासारख्या उपक्रमांवर प्रकाश टाकला.
• पूर्वोदय योजनेसारख्या राष्ट्रीय विकास धोरणांसोबत ओडिशामध्ये उचलली जात असलेली पावले हे सुनिश्चित करतात की, हे राज्य भारताच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
मुंबईमध्ये झालेल्या या रोड शोने दाखवून दिले की, ओडिशा भारताच्या औद्योगिक विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. ओडिशा सरकारचे मुख्य सचिव श्री मनोज आहुजा यांनी उदघाटन भाषणामध्ये कार्यक्रमाचा संदर्भ स्पष्ट केला, त्यानंतर उद्योग विभागाचे मुख्य सचिव श्री हेमंत शर्मा यांनी राज्याच्या औद्योगिक शक्ती आणि संधी यांना अधोरेखित करत एक तपशीलवार सादरीकरण प्रस्तुत केले. ओडिशाचा सर्वसमावेशक इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन, जागतिक स्तराची कौशल्य इकोसिस्टिम आणि धोरणात्मक स्थान हे चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.
ओडिशाच्या वाढत्या प्रभावाविषयी राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री मोहन चरण माझी यांनी सांगितले, “ओडिशामधील व्यापार-अनुकूल वातावरणामुळे याठिकाणी अनेक संधी उपलब्ध आहेत, बीआरएपी-२०२२ मध्ये देखील हे प्रदर्शित करण्यात आले होते. सिंगल विंडो क्लियरन्स सिस्टम आणि गो-स्विफ्ट सारख्या उपक्रमांसोबत आमचे राज्यात गुंतवणूक प्रक्रिया सुव्यवस्थित आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान, मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोच यामुळे ओडिशा हे औद्योगिक विकासाचे केंद्र बनले आहे. ओडिशाचे कुशल कार्यबळ आणि मजबूत प्रशासन गुंतवणूकदारांना एका उत्साही इकोसिस्टिममध्ये सहभागी होण्यासाठी आणि उत्कर्ष ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”
माननीय उद्योग मंत्री श्री संपद चंद्र स्वैन यांनी ओडिशामधील धोरणात्मक लाभांवर भर दिला, “ओडिशा आपला समृद्ध वारसा आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान यांच्यासह औद्योगिक केंद्र बनण्यासाठी सज्ज आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि “पूर्वोदय योजनेसह” पावले उचलत, ओडिशा भाराच्या विकासाचे केंद्र बनत आहे. गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर, फूड प्रोसेसिंग पार्क आणि लॉजिस्टिक्स हब यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्यात एक सुलभ व्यापारी वातावरण बनलेले आहे. ओडिशा उद्योगक्षेत्रामध्ये मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर, कुशल मनुष्यबळ आणि सहायक सरकारी धोरणे यांचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत. भुवनेश्वरमध्ये होणार असलेले उत्कर्ष ओडिशा – मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२५ भागीदारीच्या संधी शोधण्यासाठी आणि ओडिशाच्या औद्योगिक प्रगतीला पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचा मंच बनेल.”
मुंबई रोड शो यशस्वी करून ओडिशाने ऐतिहासिक गुंतवणूक शिखर संमेलनासाठी मजबूत पायाभरणी केली आहे. ५००हुन जास्त व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या, यामध्ये उद्योग विश्वातील दिग्गजांचा समावेश होता. मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह २०२५ मध्ये दिग्गज जागतिक व्यवसायांना आकर्षित करण्याचे आणि प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रमुख गुंतवणूक सुरक्षित करण्याचे वचन दिले गेले आहे, यामुळे एक प्रमुख औद्योगिक आणि नावीन्यपूर्णतेचे केंद्र ही ओडिशाची प्रतिष्ठा मजबूत होईल.