मुंबई : कोणत्याही औषधाशिवाय बाह्य उपचार पद्धत म्हणून न्यूरोथेरेपी उपचार पध्दतीकडे पाहिले जाते. रविवारी अंधेरी जे.बी. नगर येथील धनश्यामदास कॉलेजमध्ये झालेल्या मोफत न्यूरोथेरेपी उपचार शिबिराला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. काँग्रेस नगरसेवक जगदीश कुट्टी अमीन यांनीही शिबिराला भेट दिली.
अग्रवाल सेवा समाज, जेबी नगर आणि विश्वकर्मा न्यूरोथेरेपी फाऊंडेशन यांनी हा उपक्रम राबविला. १५० हुन अधिक रुग्णांनी शिबीरात सहभाग घेतला. अर्धांगवायू, लकवा, मणक्याचे आजार, दमा, स्लीपडिक्स, अर्धशिशी आदी आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले गेले. राकेश विश्वकर्मा यांनी या थेरपीमध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहेत. अग्रवाल सेवा समाज संस्थेचे पदाधिकारी बाबूलाल धनधारिया, राजेंद्र लालपुरीया ,राम अवतार अग्रवाल ,रामस्वरूप गडोदिया यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला. न्यूरोथेरेपी प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या सदस्यांचे सहकार्य घेतले.