
गुरुवारी झालेल्या वादळात सावर्डे धनगरवाडीतील बबन बाबू बावदाने यांच्या गोठ्याचे पूर्णतः नुकसान झाले आणि जनावरे दगावली होती. त्यामुळे बावदाने कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आज धनगरवाडीत जाऊन या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी बबन बावदाने यांना धीर दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, निलेश तोडकरी आदी उपस्थित होते.