
रत्नागिरी : येथील नृत्यार्पण डान्स अकॅडमी तर्फे नुकतेच भरतनाट्यम चा प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या पार पडले.
नृत्यार्पण अकॅडमी ची संचालिका प्रणाली तोडणकर हिच्या शिष्यानी या शिबिराचा लाभ घेतला. प्रणाली हिच्या गुरू, कोल्हापूरच्या भरतनाट्यम नृत्यांगना नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. दोन दिवसांचे हे शिबीर दोन विभागात घेण्यात आले. यावेळी कु. संयोगीता पाटील यांनी मुलींना पुष्पांजली आणि शब्दम या दोन रचना शिकवल्या. या कलाकृती विद्यार्थिनी येत्या गुरूपौर्णिमेदिनी सादर करणार आहेत.
गतवर्षीही अशाच प्रकारच्या शिबिराचा लाभ विद्यार्थिनींनी घेतला होता.














